Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

दतवाड येथे ४ कोटी 28 लाख 80 हजार विकास कामाचा उद्घाटन सोहळा संपन्न

 दतवाड येथे ४ कोटी 28 लाख 80 हजार विकास कामाचा उद्घाटन सोहळा संपन्न




दत्तवाड ता शिरोळ येथील शिरोळ तालुक्याचे आमदार डॉ राजेंद्र पाटील यांच्या फंडातून मंजूर झालेल्या चार कोटी 28 लाख 80 हजार विकास कामाचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा संपन्न झाला याबरोबरच दत्तवाड ग्रामस्थांना मार्फत त्यांचा सत्कार येथील गांधी चौक येथे करण्यात आला
या उद्घाटन सोहळ्या व सत्कार प्रसंगी बोलताना यड्रावकर म्हणाले, शिरोळ तालुक्याच्या विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणता आला. या पुढच्या काळात देखील निधी आणण्याचा वेग कायम राहील. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील कोणतेही गाव विकास कामांपासून वंचित राहणार नाही असे उद्गागार आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी काढले. दत्तवाड मधील ४ कोटी २८ लाख ८० हजार  विकास कामांचा लोकार्पण व शुभारंभ रविवारी सायंकाळी झाला यापूर्वी त्यांच्या निधीतून गावात झालेल्या विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा व नूतन कामाचा शुभारंभ हस्ते करण्यात आला

तालुक्यातील सर्वच गावांना मी कोणताही भेदभाव न करता गट- तट अथवा पक्ष भेद न मानता सातत्याने निधी दिला आहे. विकास कामात राजकारण आणू नये ही माझी नेहमीची भूमिका आहे. विकास कामासाठी गट-तट विसरून सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे असेही आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यावेळी म्हणाले.
यावेळी सरपंच चंद्रकांत कांबळे उपसरपंच रूपाली पोवाडी गुरुदत्त कारखान्याचे संचालक बबन चौगुले, बाळासाहेब शिंदे, तानाजी मोहिते, प्रभू चौगुले, धन्यकुमार सिदनाळे, आण्णासाहेब पाटील- गुमटे, प्रकाश चौगुले, भैय्या चौगुले, तंटामुक्त अध्यक्ष सुरेश पाटील, राजगोंडा पाटील, संजय पाटील, नूर काले, शामराव बिरणंगे, चंद्रकांत बिरणंगे त्याचबरोबर ग्रा.पं. सदस्य, नागरिक, यड्रावकर ग्रुपचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.