Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

वडगाव मधील अडत्यास वांग्याचा हार घालून आणि फेटा बांधून सत्कार

 वडगाव


27 पैसे वांग्याला दर देऊन शेतकऱ्याला फसवणाऱ्या वडगाव मधील अडत्यास वांग्याचा हार घालून आणि फेटा बांधून सत्कार केला. 

शेतकऱ्याचा माल मातीमोल दराने व्यापाऱ्याच्या पदरात टाकून आपलं आणि व्यापाऱ्याचं उखळ पांढरं केलं आणि शेतकऱ्याची जिरवली म्हणून त्याचा सत्कार केल्याचे आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी यावेळी सांगितले. 

शिरोळ चे शेतकरी विक्रम जगदाळे यांनी वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील ओम पानाचंद ट्रेडिंग कंपनी ला 237 किलो वांगी दिली होती या 237 किलो वांग्याचे हमाली आणि वाहतूक खर्च वजा करून 66 रुपये ची पट्टी पाठवली होती. म्हणजे 237 किलो वांगी विकून शेतकऱ्याला 66 रुपये मिळाले म्हणजे 27 पैसे प्रति किलोने वांगी विकली गेली.ही शेतकऱ्याची चेष्टा आहे कारण 

ग्राहकांना बाजारात वांगी 30 ते 40 रुपयांना घ्यावी लागत आहेत आणि शेतकऱ्याला मात्र 27 पैसे हातात देऊन अडते आणि व्यापारी मधल्या मध्ये माला माल होत आहेत. 

शेतकऱ्याला ही 237 किलो वांगी तोडण्यासाठी 2500 रुपये खर्च आला होता वांग्याचा उत्पादन खर्च वेगळा पण त्याबदल्यात 66 रुपये देऊन शेतकऱ्याची चांगलीच जिरवली म्हणून आज *वडगाव मधील त्या अडत्याचा वांग्याचा हार घालून व फेटा बांधून आंदोलन अंकुश कडून  सत्कार केला गेला.*

*या अडत्याचे लायसन रद्द करण्याचे बाजार समितीने मान्य केले असून शेतकऱ्याला फसवणाऱ्या प्रवृत्तीना बाजार समितीत अजिबात थारा देऊ नये अशी विनंती केली आहे* 

यावेळी शेतकरी विक्रम जगदाळे, उदय होगले, अक्षय पाटील, आप्पासो कदम, महेश जाधव, बंडू होगले हे उपस्थित होते.