रमेशकुमार मिठारे यांना समाज जागृती पुरस्काराने सन्मानित
रमेशकुमार मिठारे यांना समाज जागृती पुरस्काराने सन्मानित
टाकवडे येथील फुले,शाहू, आंबेडकर विचार मंचच्या वतीने अकिवाटचे रमेशकुमार मिठारे यांना समाज जागृती पुरस्काराने तालुक्याचे माजी सभापती, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील-टाकवडेकर व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला.हा पुरस्कार सोहळा १९ एप्रिल रोजी शिरोळ तालुक्यातील टाकवडे येथील आंबेडकर चौकच्या प्रांगणात संपन्न झाला.रमेशकुमार मिठारे
हे शिरोळ तालुका पतसंस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष म्हणुन धुरासांभाळत पतसंस्था कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी लागु करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्याचबरोबर पतसंस्था समोरील शासनाच्या जाचक अटी कशा कमी करता येतील यावर राज्यपातळीवर त्यांचा पाठपुरावा चालु आहे.हे काम करत असताना त्यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संघटनेचे शिरोळ तालुकाध्यक्ष पद सांभाळत ठिक ठिकाणी ग्राहक मेळावा घेऊन जनजागृती करत आहेत.महापुर , गायरान अतिक्रमण असो अशा अनेक गोष्टीत त्यांनी नागरीकांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न त्यांचा चालू आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात जनजागृती करत आहेत याचेच औचित्य साधून त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेचा संयोजकांनी सांगितले. या पुरस्कारावेळी प्रमुख पाहुणे माजी सभापती प्रकाश पाटील -टाकवडेकर, राज्यसेवा राजपत्रित सनदी अधिकारी -अजिंक्य इंगवले,वडगांव महाविद्यालयाचे प्राध्यापिका -श्व़ेता चौगुले, ग्रामपंचायत सदस्य -रोहीत पाटील, दत्तात्रय कुलकर्णी, दिपक निर्मळ, सुरेश कांबळे,रुकडीचे लोकनियुक्त सरपंच -राजश्री कांबळे ,स्वरतरंग इचलकरंजीचे एस एन कोरे,फुले-शाहु-आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष-राजेंद्र कांबळे (पत्रकार), शिवाजी एडवान, पुरस्कारकर्ते व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.