Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

नामदेव निर्मळे (पत्रकार) यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दर्शन घेऊन विठुरायाला महापूर व कोरोना येऊ नये यासाठी साकडे...

 नामदेव निर्मळे (पत्रकार) यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दर्शन घेऊन विठुरायाला महापूर व कोरोना येऊ नये यासाठी साकडे...


   टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील (पत्रकार )नामदेव निर्मळे यांचा 16 एप्रिल वाढदिवसानिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दर्शन घेऊन  विठुरायाला कोरोना व महापूर येऊ नये यासाठी साखडे घालण्यात आले.

  स्वतः नामदेव निर्मळे शेतकरी असल्यामुळे महापूर आल्यावर शेतकऱ्याची काय अवस्था होते हे त्यांनी स्वतः अनुभवलेले आहे.

   कोरोना सारख्या भयंकर आजारातून महाराष्ट्राची सुटका व्हावी. कोरोनामुळे अनेकांचे जीवनमान खालावलेली आहे. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती फार निर्माण होते. 

   तसेच त्यांनी श्री गुरुदत्त शुगर्स नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतो. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मा.श्री. राहुल दादा घाटगे यांच्या पुढाकाराने नामदेव निर्मळे व त्यांच्या दोन्ही मुली कुमारी शौर्या व कुमारी स्वरा या तिघांनी नाकाला जीभ लावणे या कलेतून त्यांनी रेकॉर्ड केले व गावचे नाव पूर्ण देशभरात पोहोचवले.

   ते बोलताना म्हणाले की माझे गुरु अनिरुद्ध शिपुगडे, दैनिक पुढारी चे चेअरमन योगेश जाधव साहेब, कर्तव्यदक्ष तहसीलदार सौ.अपर्णा मोरे धुमाळ, सौ. स्वाती सासणे मॅडम, बहिण अंजली निर्मळे ,वडील पुंडलिक निर्मळे, आई मंगल निर्मळे, दादा खोत ,जयपाल काणे, निलेश लंके साहेब या सर्वांचे सुद्धा त्यांनी आभार मानले.

   यांचा सत्कार आज सैनिक वेल्फेअर असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष  ऑर्नरी कॅप्टन रमेश निर्मळे, महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष माजी सुभेदार केंदबा कांबळे, माजी सैनिक लक्ष्मण निर्मळे, सामाजिक कार्यकर्ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बाजीराव गोरे, संजय कुंभार (विटउद्योजक), जयपाल काणे भारतीय जनता पार्टी टाकळीवाडी शाखा अध्यक्ष व जैन प्रकोष्ट कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष, ऋषिकेश माळगे, अजिंक्य कांबळे, उदय कांबळे, लक्ष्मण भमाणे, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार रमेश मिठारे आदींनी भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.