दत्तात्रय कमते यांची मुख्याध्यापक पदी निवड
दत्तात्रय कमते यांची मुख्याध्यापक पदी निवड
टाकळीवाडी --
ता. शिरोळ येथील जिल्हा परिषद कुमार विद्यामंदिर टाकळीवाडी शाळेतील शिक्षक दत्तात्रय कमते यांची मुख्याध्यापक पदी निवड झाली.
यांची बदली जिल्हा परिषद शाळा घोसरवाड तालुका शिरोळ येथे झाली आहे. कोल्हापूर शिक्षण विभागाने नुकतीच बढती दिली.
यांची नोकरीची सुरुवात शाहुवाडी तालुक्यातून झाली. येथे ३वर्षे सेवा बजावल्यावर त्यांची नियुक्ती जिल्हा परिषद दतवाड शाळा येथे झाली. येथे २४ वर्षे सेवा बजावली. अनेक चांगल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम त्यांनी केले. अनेक विद्यार्थी उच्च पदावर काम करत आहेत. सन 2016 वर्षी त्यांची बदली टाकळीवाडी येथील कुमार विद्या मंदिर मध्ये झाली. पदवीधर अध्यापक म्हणून झाली.
७ वर्षे आपली सेवा बजावून शाळेच्या प्रगतीत आपले योगदान दिले. गावातील नागरिकांचा, पालकांचा, सहभाग चांगला राहीला.
येथील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, ऋग्वेद पुरस्कार, बाल रक्षक पुरस्कार मिळाले.
अनेक सामाजिक ,शैक्षणिक, उपक्रम राबवले. सर्व शासकीय योजनांची शंभर टक्के अंबलबजावणी केली.
शैक्षणिक उठावातून शाळेची प्रगती केली. साने गुरुजी शिक्षक पतसंस्था संचालक म्हणून निवड झाली. अनेक विद्यार्थी केंद्रात सरसावले. क्रीडा, सांस्कृतिक, स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना घडवले. तालुक्यात,जिल्ह्यात, शाळेचे नाव रोशन केले.
34 वर्षाच्या सेवेनंतर आता त्यांना मुख्याध्यापक पदी निवड झाली.