अकिवाट येथे कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचे शेतकरी हितगुज संवाद उत्साहात संपन्न
अकिवाट येथे कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचे शेतकरी हितगुज संवाद उत्साहात संपन्न
अकिवाट
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि,हुपरी यांच्यावतीने शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे सभासद व शेतकरी वर्गासाठी हितगुज दौरा केन कमिटी चेअरमन डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी ऊस विषयक प्रश्नांवर शेतकरी वर्ग व सभासदांशी चर्चा करण्यात आली.यावेळी जवाहर साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सवलती,पुरवण्यात येणारी बी बियाणे,ऊसाची रोपे आदीबाबत चर्चा करण्यात आली.तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याची ग्वाही देण्यात आली.
मार्गदर्शन करताना डॉ.राहूल आवाडे म्हणाले की हा हितगुज संवाद राजकीय फायद्यासाठी नाही तर कोरोना , महापूर या नैसर्गिक आपत्तीत माझे शेतकरी बांधव अनेक संकटांना सामोरे गेले आहेत.अशी परिस्थिती पुन्हा उदभवू नये यासाठी देवाचरणी प्रार्थना करतो.शेतकरी व कारखान्याचे संबंध दृढ व्हावेत यासाठी कारखाना मार्फत ऊस विकास योजनेअंतर्गत बिनव्याजी उसपुरवठा केला जातो त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.भविष्यात सभासद शेअर रक्कमेवर साखर देता येते का याबाबत सहकार आयुक्तांकडे मागणीकरू असे आश्वासन दिले.
यावेळी संचालक संजयकुमार कोथळी,विजय कुंभोजे, दादासाहेब सांगावे,जिनगोंडा पाटील, उपशेती अधिकारी भास्कर पट्टणकडेसो,युवा नेते सुहासदादा पाटील व्यासपीठावर होते. तर या मेळाव्यास इकबाल बैरगदार, रावसाहेब नाईक, आप्पासाहेब बडबडे, बाळासाहेब नाईक, आण्णासाहेब हसुरे, विशाल आवटी,श्रेणीक चौगुले, आप्पासाहेब म्हैशाळे, आण्णासाहेब पाणदारे, ॲड.अरुण कल्लण्णाव्वर, बाबासाहेब होसकल्ले,कुमार रायनाडे,राजगोंडा पाटील आदी मान्यवरांसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.हितगुज मेळाव्याचे नियोजन अकिवाट विभागाचे शेती कार्यालयाचे स्टाॅफ यांनी केले होते.संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार रमेशकुमार मिठारे यांनी केले.