आंदोलन अंकुश च्या पूरमुक्ती लढ्याला पाठबळ द्या
आंदोलन अंकुश च्या पूरमुक्ती लढ्याला पाठबळ द्या
कुरुंदवाड : महापुरावर कायमस्वरूपी उपाय योजना सरकारने कराव्यात व अलमट्टी च्या उंचीला सरकार ने आव्हान द्यावे या दोन प्रमुख मुद्यावर 1 जूनची पूर परिषद होणार आहे या पूर परिषदेला कुरुंदवाडकरांनी मोठया संख्येने येऊन आंदोलन अंकुश च्या पूरमुक्ती लढ्याला बळ द्यावे असे आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी कुरुंदवाड येथील सभेत केले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चॊकात काल झालेल्या सभेत ते पुढे म्हणाले की या देशाला स्वातंत्र्य हे चळवळ व बलिदानातून मिळालेले आहे अण्णा हजारे यांनी उपोषणाच्या माध्यमातून सरकार ला अनेक जण हिताचे कायदे करण्यास भाग पाडल्याचे चांगले उदाहरण आहे तर गेल्याच वर्षी पंजाब हरियाणा आणि उत्तरप्रदेश मधील शेतकऱ्यांनी जण आंदोलनाच्या रेट्यातून केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घेण्यास भाग पाडल्याचे आपण सर्वांनी पाहिलं असल्याचे सांगून त पुढे म्हणाले की आपल्यावर वारंवार येणारे महापुराचं संकट रोखायचे असेल तर सर्वांनी एकत्रित येऊन याविरोधात एल्गार पुकारला तरच सरकार काही तरी उपाय करण्यास सुरुवात करेल. कुरुंदवाड हे शहर महापुराने सर्वात जास्त बाधित होणारे असल्यामुळे आमच्या 1 जून रोजीच्या कुरुंदवाड संगम घाटावरील पूर परिषदेला सर्व घटकांनी सामील होऊन हा लढा आणखी तीव्र करावा असे पुनश्च्य आवाहन केले.
आंदोलन अंकुश चे तालुकाध्यक्ष दिपक पाटील व युवाध्यक्ष कृष्णा देशमुख यांची भाषणे झाली यावेळी रशीद मुल्ला पोपट संकपाळ महादेव काळे मुजाहिद पटेल सुरेश गोंधळी व नागरिक हजर होते.