महापूर नैसर्गिक नाही तर मानवनिर्मित आपत्ती मानवी प्रयत्नाने महापुरावर नियंत्रण शक्य : धनाजी चुडमुंगे
महापूर नैसर्गिक नाही तर मानवनिर्मित आपत्ती
मानवी प्रयत्नाने महापुरावर नियंत्रण शक्य : धनाजी चुडमुंगे
खिद्रापूर :
महापूर हे नैसर्गिक नसून मानव निर्मित आहे यातून आपली पुढची पिढी बरबाद होणार आहे ते वाचवायचे असेल तर जनरेट्याशिवाय पर्याय नाही यासाठी 1 जून च्या पूर परिषदेला यावे असे आवाहन खिद्रापूर येथे झालेल्या सभेत आंदोलन अंकुश प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केले.
चुडमुंगे पुढे म्हणाले की कमी कालावधीत जास्त पाऊस पडला किंवा ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यास महापूर हा येणारच नैसर्गिक आपत्ती सरकार टाळू शकत नाही असं सरकार म्हणतंय पण अचानक पाऊस येऊन पूर येणे हे जरी नैसर्गिक असले तरी पुराचे पाणी 10 ते 12 दिवस साचून राहते हे अनैसर्गिक असल्यामुळेच आमचे मत आहे की हा महापूर नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे आणि यावर मानवी प्रयत्नाने नियंत्रण आणता येते पण सरकार त्याबाबत गंभीर नाही सरकार ला उपाय योजना करायला भाग पाडण्यासाठी सर्वांनी आमच्या पूर मुक्ती लढ्यात सहभागी व्हावे
कुरुंदवाड संगम घाटावरील 1 जून रोजीच्या पूर परिषदेला पूर व जल तज्ञ् यांना मार्गदर्शनासाठी बोलावले आहे ते तज्ञ आपल्याला लागोपाठ येणाऱ्या महापुराची नेमकी कारणे काय आहेत आणि यावर करता येण्यासारखे उपाय कोणते हे सविस्तर सांगणार आहेत ते आपण ऐकावे महापूर समजून घ्यावा म्हणून तुम्हाला पूर परिषदेला थोडा वेळ काढून यावे लागेल असंही धनाजी चुडमुंगे यांनी उपस्थित लोकांना सांगितले.
प्रारंभी स्वागत कुलदीप कदम यांनी केले तर अक्षय पाटील कृष्णा देशमुख व दिपक पाटील विनोद पाटील यांनी आपले विचार मांडले आभार बसगोंडा पाटील यांनी मानले.
यावेळी खिद्रापूर विकास सेवा संस्थेचे चेअरमन रावसाहेब रायनाडे,, जहागीर सनदी, बाळासो कोळी, बापूसो माने,आदी व नागरिक उपस्थित होते