सैनिक टाकळी येथे उन्हाळी शिबिर उत्साहात संपन्न
सैनिक टाकळी (प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पारंपारिक खेळाची माहिती करून देणे आवश्यक आहे यासाठी शिबिराच्या माध्यमातून शाळेने योग्य पाऊल उचलले असल्याचे मत माजी सैनिक संघटनेचे माजी अध्यक्ष बी. एस .पाटील यांनी केले. ते येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल मधील उन्हाळी शिबिराच्या सांगता समारंभामध्ये बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक विनोद पाटील तर प्रमुख उपस्थिती प्रगतशील शेतकरी अमर पाटील यांची होती. यावेळी पाटील पुढे म्हणाले.विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता शोधून त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी खेळामध्ये राष्ट्रीय पातळी पर्यंत चमकू शकेल यासाठी कायम सराव करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले . यावेळी शिबिरार्थीनी लाठी काठी , दांडपट्टा ,झांज ,लेझीम, मलखांब, रोप क्लायबिंग , इत्यादी खेळांचे प्रात्यक्षिक दाखवत पालकांची मने जिंकली . शाळेच्या वतीने प्रशिक्षक शिवाजी गायकवाड, विजय हेगान्नावर, प्रशांत इंगळे, ज्योती भोसले, किरण पाटील,सुमित सावंत, वरद बसर्गे, सुरेश तिप्पण्णावर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी प्रशिक्षणार्थीनां उपस्थितांच्या हस्ते प्रशस्तीपत्रकाचे वितरण करण्यात आले. स्वागत व प्रस्ताविक क्रीडा शिक्षक उदय पाटील यांनी केले तर आभार आर एम पाटील यांनी मानले कार्यक्रमास वैभव पाटील, सयाजी पाटील, संदीप बदामे , संजीवनी पाटील यांच्यासह पालक वर्ग उपस्थित होता