पंचायत समिती शिरोळच्या गट शिक्षणाधिकारी यांच्या केबिनचे उद्घाटन.
पंचायत समिती शिरोळच्या गट शिक्षणाधिकारी यांच्या केबिनचे उद्घाटन.
शिरोळ : पंचायत समिती शिरोळ च्या गट शिक्षण अधिकारी यांच्या केबिनचे उद्घाटन सोमवार दि.२२ मे२०२३ रोजी मोठया उत्साहात संपन्न झाले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले. शिक्षण विस्तार अधिकारी दिपक कामत यांनी श्रीफळ वाढविले. प्रमुख पाहुणे म्हणून गट विकास अधिकारी शंकर कवितके होते.
शिरोळ तालुक्यातील शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्था कुरुंदवाड,साने गुरुजी प्राथमिक शिक्षक पतसंस्था जयसिंगपूर,बॅ.बाळासाहेब खर्डेकर शिक्षक व शिक्षकेतर सेवकांची सहकारी पतसंस्था जयसिंगपूर यांच्या सहकार्याने केबिन साकार झाली.विषय शिक्षक संघटनेच्या वतीने खुर्च्या देण्यात आल्या.केबिनचे काम नामदेव सन्नके,बाजीराव कोळी यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाली. त्यानिमित्त त्यांचा सत्कार गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्या हस्ते करणेत आला.
याप्रसंगी गट शिक्षण अधिकारी भारती कोळी, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे, प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन सुनिल एडके,शिक्षक संघटना समन्वय समिती अध्यक्ष -सुरेश पाटील,सरचिटणीस राजाराम सुतार,भगवान कोळी, प्रकाश खोत,रियाज चौगुले,राजेंद्र यळगुडे, संतोष जुगळे, सुनिल कोळी,दिलीप शिरढोणे,मेहबूब मुजावर,शरद सुतार,रमेश कोळी,परशराम चव्हाण, रमजान पाथरवट, मोअज्जम चौगले, सुनिल खिलारे, पी.के.कांबळे,विजयकुमार पाटील,भालचंद्र खोत,मदन कांबळे,सलीम अत्तार,दयानंद दिपंकर,महेश घोटणे, सुभाष पडोळकर,सतिश कोळी, यांचेसह कार्यालयीन स्टाफ उपस्थित होते.