Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन.

 बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन.



शिरोळ :अनाथ, निराश्रीत,बेघर व अन्य प्रकारे आपत्तीक असलेल्या( Crisis) बालकांचे संस्थाबाह्य व कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे या दृष्टीने सदर मुलांना संस्थेत दाखल न करता संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणणे या उद्देश्याने महिला व बाल विकास विभागामार्फत बालसंगोपन योजना राबविण्यात येते. 

         बालकांच्या पात्रतेचे निकष : ०ते १८ वयोगटातील पुढील प्रकारच्या बालकांना ही योजना लागू राहील.

१.अनाथ किंवा ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नाही व जी दत्तक देणे शक्य होत नाही अशी बालके.

२. एक पालक असलेले बालके मृत्यू,घटस्फोट,विभक्तीकरण, परीतक्त्या,अविवाहित मातृत्व, गंभीर आजार,एक वा दोन्ही पालक रुग्णालयात असल्याने इत्यादी कारणामुळे विघटीत झालेल्या कुटुंबातील बालक, कुष्ठरुग्ण व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची बालके.

३.पालकांमधील तीव्र वैवाहिक बेबनाव,अति हेटाळणी व दुर्लक्ष अशा उपवादात्मक परिस्थितीतील बालके.

४.शासकीय / स्वयंसेवी संस्थेतील प्रवेशित तसे संस्थाबाह्य बालके या दोघांनाही योजना लागू राहील.

बालसंगोपन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे :

१.लाभार्थ्यांचा जन्मतारखेचा दाखला.

२.पालकांचा मृत्यु दाखला ( हयात नसल्याबाबत)

३.पालकांचे हमीपत्र

४.डॉक्टरांचे पालक सक्षम असल्याबाबतचे पुरावा प्रमाणपत्र.

५.उत्पन्न दाखला ( तलाठी )

६.रेशनकार्ड झेरॉक्स / रहिवासी दाखला / मतदान ओळखपत्र.

७.दोन प्रतिष्ठीत व्यक्तींचे दाखले

८.शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट

९.अर्जदाराचा लाभार्थीसमवेत घराचे दर्शनी भागाचा फोटो.

१०.राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स

११.बालक व पालक आधारकार्ड

           महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्र. बालस-२०२१ /प्र.क्र. ७६ / का-०८यानुसार दि. १ एप्रिल २०२३पासून बालसंगोपन योजनेतंर्गत बालकांच्या संगोपनासाठी पालकांस २२५० /- इतके अनुदान दरमहा देण्यात येते.

          तरी वरील योजनेसाठी तालुका संरक्षण अधिकारी यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करणेत येत आहे.

           सदर योजनेसंदर्भात गटविकास अधिकारी शंकर कवितके यांनी केंद्र प्रमुखांच्या बैठकीत सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी भारती कोळी,शिक्षण विस्तार अधिकारी दिपक कामत,अनिल ओमासे,केंद्रीय प्रमुख उपस्थित होते.