पावसाळ्यापूर्वी धरणे रिकामी केल्यास महापुरावर नियंत्रण शक्य
पावसाळ्यापूर्वी धरणे रिकामी केल्यास महापुरावर नियंत्रण शक्य
धरण प्राधिकरणांनी नियमांचे पालन न केल्यास कायद्याचा बडगा दाखवू धनाजी चुडमुंगे यांचा इशारा
अकिवाट : 1 जून ला प्रत्येक धरणात त्या धरणाच्या एकूण साठवणूक क्षमतेच्या 10% पेक्षा जादा पाणी साठा ठेऊ नये अशी मार्गदर्शक सूचना केंद्रीय जल आयोगाने देशातील सर्व मोठया धरणांना घालून दिली आहे पावसाळ्यात या धरणांची पाणी साठवणूक क्षमता वाढावी व पाण्याचा विसर्ग करायची आवश्यकता भासू नये म्हणून अशा प्रकारची बंधने धरणांना घातली आहेत याचे पालन जरी धरण प्राधिकरणांनी केले तरी महापूराचे नियंत्रण होऊ शकते असे मत चुडमुंगे यांनी अकिवाट येथील पूर मुक्ती जण संवाद यात्रेच्या सभेत व्यक्त केले सभेच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सद्दश बाळासो म्हैशाळे होते.
अकिवाट स्टँड चौकात काल झालेल्या सभेत धनाजी चुडमुंगे पुढे म्हणाले की 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये थोडा जादा पाऊस झाला पण महापूर आला नाही याचं कारण पावसाळ्यापूर्वी कोयना धरण पूर्ण रिकामे केले होते व जून ते ऑगस्ट दरम्यान पडलेल्या पाऊसाचे संपूर्ण पाणी धरणात साठवले गेले विसर्ग करण्याची गरज भासली नाही आणि विसर्ग न केल्यामुळेच शिरोळ तालुक्यासह सांगली कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आलेला नाही ही वस्तुस्थिती आहे दोन वर्ष आम्ही सातत्याने या मुद्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारशी पत्रव्यवहार केला होता कायदेशीर तरतुदी कोणत्या आहेत याची अधिकाऱ्यांना जाणीव करून दिली होती आणि जर याकडे दुर्लक्ष केले गेले व पुन्हा महापूर येऊन नुकसान झालेस याची भरपाई आपल्या कडून वसुल केली जाईल अशा कायदेशीर नोटीस लागू केल्यामुळे अधिकाऱ्यांनी केंद्रीय जल आयोगाच्या तरतुदींचे पालन केले व त्याचा परिणाम आपल्या समोर आहे.
मागील चार महापूर आले त्या प्रत्येक वर्षी कोयना वारणा धरणात अतिरिक्त पाणी साठा ठेवला गेला होता अचानक कमी कालावधीत जास्त पाऊस पडू लागला आणि पाण्याचा विसर्ग वाढवला गेल्याने व अलमट्टी धरणाने सुद्धा पूर्ण क्षमतेने पाणी पातळी ठेवल्याने सांगली कोल्हापूर सह शिरोळ तालुक्याला महापुराचा फटका बसलेला आहे.भविष्यात पुन्हा अशा चुका होऊ नयेत व सरकार ने महापुरावर कायमस्वरूपी उपाय योजना राबवाव्यात म्हणून आम्ही 1 जून रोजी कुरुंदवाड संगम घाट येथे पूर परिषद आयोजित केली आहे अकिवाट करांनी मोठया संख्येने या पूर परिषदेला उपस्थिती दाखवावी अशी विनंती त्यांनी शेवटी केली.
स्वागत व प्रास्तविक बाळसिंग राजपूत सर यांनी केले तर शीतलनाथ हरिंगळे यांनी आभार मानले यावेळी महेश जाधव कृष्णा देशमुख दिपक पाटील यांची भाषणे झाली तर राकेश जगदाळे आण्णासो वडगावे महादेव काळे ग्रामपंचायत सद्दश सलमान बैरागदार जाफर तहसीलदार बाबासाहेब होसकल्ले सुहास पाटील बाळूमामा उमाजे राजू कुंभार वकील सूरज रायणाडे सुशांत नाईक कृष्णत भेंडे अशोक बिरंगें सौरभ पाटील यांच्या सह नागरिक हजर होते.