शासनाचे डोळे उघडण्यासाठी पूर परिषदेचे आयोजन : धनाजी चुडमुंगे
शासनाचे डोळे उघडण्यासाठी पूर परिषदेचे आयोजन : धनाजी चुडमुंगे
जुने दानवाड : येथे काल रात्री 1 जून च्या पूर परिषदेच्या पार्शवभूमीवर जागृती सभा झाली त्यावेळी धनाजी चुडमुंगे यांनी पूर परिषदेचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की 2005 पासून आपल्या भागात चार महापूर आले पण सरकार महापूर येऊन गेल्यावर भिके समान नुकसान भरपाई देऊन आपली चेष्टा करत आहे हे आपण सर्वांनी भोगलेलं आहे आता सरकार च्या मदतीवर विसंबून न राहता महापूर येऊच नये यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायची आवश्यकता निर्माण झाली आहे आणि त्यासाठीच आम्ही लागोपाठ येणाऱ्या महापुरावर शासनाने उत्तर काढावे म्हणून कुरुंदवाड च्या संगम घाटावर 1 जून रोजी पूर परिषद घेत आहोत सर्वांनी या परिषदेला हजर राहून आमच्या पूर मुक्ती लढ्याला बळ द्यावे असे आवाहन केले.
ब्रम्हनाथ मंदिर समोर झालेल्या सभेत स्वागतपर प्रास्ताविक करताना कोमल पाटील यांनी सांगितले की कोरोना वर लशींच्या माध्यमातून मात केली मग आमच्याकडे नेहमी येणाऱ्या महापुरावर सुद्धा उपाय आहेत पण सरकार करत नाही त्यांना ते करायला भाग पाडण्यासाठी आपण या पूर परिषदेला जायला पाहिजे तेही आपल्या फायद्यासाठी जायचं आहे.
आभार व्यक्त करताना बाबगोंड पाटील सर म्हणाले की महापुरामुळे काय हाल होतात आणि किती नुकसान होते हे आम्हाला चांगलं माहित आहे पुन्हा महापूर येऊ नये म्हणून धडपडनाऱ्या आंदोलन अंकुश ला आम्ही साथ देऊच पण वेळ पडली तर आपल्या पुढे सर्व गाव असेल असं त्यांनी सांगितले.
यावेळी तालुकाध्यक्ष दिपक पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं यावेळी राकेश जगदाळे महादेव काळे आप्पासो वडगावे डॉक्टर आप्पासो करोले ए बी पाटील सर महावीर पिरकाने विजय मलिकवाडे कुमार टिप्पणावर सुरेश कुंभोजे यांच्या सह ग्रामस्थ हजर होते.
महाराष्ट्रात महापुराने सर्वात जास्त नुकसान होणारं गाव म्हणून आपली ओळख आहे 2019 च्या महापूराचे आपल्या गावचे फोटो पुराची गंभीरता किती भयानक आहे हे दर्शवत होते.आपल्या गावात जो उंचवटा असलेला भाग मागच्या चार महापुरात वाचलेला होता तिथे तुमची जनावरे सुरक्षित राहू शकली पण आता तो भागही पुराच्या विळख्यात येणार आहे कारण अलमट्टी ची उंची 15 फुटाणे वाढवली जाणार आहे. अलमट्टी च्या उंचीला विरोध करण्यासाठी आम्ही ही पूर परिषद घेतली आहे थोडंफार संरक्षण करणारा भाग वाचवायचा असेल तर सर्वांनी मोठया संख्येने पूर परिषदेला यावे असे आवाहन कृष्णा देशमुख यांनी केले.