कुमार घोसरवाडच्या अक्षय डवरी याची शासकीय विद्यानिकेतन पुसेगाव येथे निवड.
कुमार घोसरवाडच्या अक्षय डवरी याची शासकीय विद्यानिकेतन पुसेगाव येथे निवड.
घोसरवाड: घोसरवाड ता. शिरोळ येथील कुमार विद्या मंदिर चा इयत्ता ५ वी मधील विद्यार्थी अक्षय मच्छिंद्रनाथ डवरी याची शासकीय विद्यानिकेतन पुसेगाव जिल्हा सातारा येथे निवड झाली. त्याबद्दल त्याचा सत्कार केंद्रप्रमुख रमेश शंकर कोळी यांचे हस्ते करण्यात आला. याप्रसंगी पालक मच्छींद्र डवरी, गुंडा परीट,दशरथ खोत,अमोल भंडारे,सुशांत कांबळे,अंगणवाडी सेविका -खोत मॅडम,कमते मॅडम उपस्थित होते.
वर्गशिक्षक शामराव कांबळे,नंदकुमार पवार यांचे मार्गदर्शन लाभले तर मुख्याध्यापक संजय निकम, केंद्रप्रमुख रमेश शंकर कोळी, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे,गट शिक्षण अधिकारी भारती कोळी यांचे प्रोत्साहन लाभले.