Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

दूधगंगा नदीतून वाळू उपसा होत नाही-सरपंच चंद्रकांत कांबळे

 दत्तवाड -


-दत्तवाड येथे कोरड्या पडलेल्या दूधगंगा नदी पात्रातून कोणत्याही प्रकारचे अवैध वाळू उपसा होत नसून शेतकरी शेतीच्या पाण्यासाठी नदीत जेसीबीने खड्डा काढत आहेत. तिथून कुठेही वाळूची वाहतूक होत नाही. तीव्र पाणीटंचाईमुळेच शेतकरी खड्डा काढून पाणी साठवून शेतीला पाणीपुरवठा करत आहेत. याबाबत वाळू उपसा होत असल्याची खोटी माहिती पसरवली जात आहे मात्र तशी काही घटना घडली नसल्याची माहिती  पत्रकार परिषदेत दतवाडचे सरपंच चंद्रकांत कांबळे यांनी दिली.

             दतवाड ग्रामपंचायत मध्ये आम्ही अडीच वर्षात सत्तेत आल्यापासून अनेक विकास कामे झाली आहेत . आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व तालुक्यातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी यासाठी सहकार्य केले असून गावातील सहा वॉर्डामध्ये विकासकामे जोराने सुरू आहेत. असेही त्यांनी सांगितले
         गेली पंधरा दिवस दत्तवाड येथे तीव्र पाणीटंचाई आहे दूधगंगा नदी कोरडी पडली असून पिण्याच्या पाण्यासह शेतीचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे यातून ग्रामपंचायतीने मार्ग काढण्यासाठी अनेक कुपनलिका सुरू केले आहेत ,काही कुपनलिकाला विद्युत मोटारी जोडण्याचे काम सुरू असून त्यातून पाण्याच्या प्रश्न सोडवला जात आहे तर काही ठिकाणी जादा पाईप जोडून पाणी उपसा केले जात आहे. ग्रामपंचायत पाणी प्रश्नावर गंभीर असून नागरिकांना होणाऱ्या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. गावच्या विकास कामाबाबत सूचना जरूर कराव्यात पण खोट्या बातम्या पसरू नयेत, नागरिकांनी व प्रसारमाध्यमांनी ग्रामपंचायतला याबाबत सहकार्य करावे असे आव्हानही त्यांनी केले. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष सुरेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
 पत्रकार परिषदेला पोलीस पाटील संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील, देवराज पाटील, बाबुराव पोवार, राजु पाटील सुळकूडे, प्रकाश चौगुले, दादा पोवाडी,  जितेंद्र दावणे, उपस्थित होते.