Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

श्री विद्यासागर हायस्कूल अकिवाट चा 58 वा वर्धापन दिन संपन्न

  श्री विद्यासागर हायस्कूल अकिवाट चा 58 वा वर्धापन दिन संपन्न


अकिवाट येथील श्री बाहुबली विद्यापीठाचे श्री विद्यासागर हायस्कूल चा 58 वा वर्धापन दिन शनिवार दिनांक 17 रोजी उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय समितीचे चेअरमन कमलाकर चौगुले हे होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कॅनडाचे पोलीस अधिकारी सत्यानंद गायतोंडे हे होते यावेळी दुधगावची कन्या दिव्या दादासो वाडकर हिचा पहिल्या प्रयत्नांमध्ये सीए उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी अकिवाट गावचे सुपुत्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अण्णाप्पा भीमू पाणदारे यांचा सत्कार करण्यात आला शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी दहा डझन वह्या गरीब विद्यार्थ्यांसाठी भेट दिल्या या प्रसंगी स्वागत व प्रास्ताविक करताना प्रशालेचे मुख्याध्यापक श्री डी बी वाडकर सर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले व परिचय करून दिला व शाळेच्या विकासाचा संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली सत्काराला उत्तर देताना दिव्या दादासो वाडकर हिने सीए होताना तिने केलेले प्रयत्न त्यामध्ये तिच्या यशामधील  लोकांचे योगदान व त्यामध्ये आलेल्या अडचणी व तीने कसे मार्ग काढले याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सत्यानंद गायतोंडे व अभिजीत भोसले जे नेव्ही मध्ये अधिकारी आहेत त्यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे कष्ट त्याची जाणीव ठेवून अभ्यास करावा व आपले करिअर घडवावे असे मार्गदर्शन केले गायतोंडे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी त्यांचे व्यक्तिमत्व घडवताना आपल्या सभोवतालच्या वातावरणाचे जागरूकपणे निरीक्षण करावे जेणेकरून त्यांचे व्यक्तिमत्व चांगले घडेल व सकारात्मक राहून आयुष्यात प्रयत्न केल्यास सर्व काही साध्य करू शकता असे सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष कमलाकर चौगुले यांचा आज 87 वा वाढदिवस होता त्याबद्दल विद्यालयामार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी त्यांचे यावेळी औक्षण केले व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी कमलाकर चौगुले यांनी आपल्या मनोगत गावामध्ये शिक्षणाची सोय नसल्यामुळे मुलांचे शिक्षणाची सोय व्हावी यासाठी ही शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले व गावातील मुलांना शिक्षणाचे सोय केली व आपल्या जीवनाचे ध्येय साध्य केले असे सांगितले यावेळी शालेय समितीचे सर्व सदस्य, पत्रकार रमेश मिठारे व गणपती कागे, शाळेतील सर्व अध्यापक अध्यापिका कर्मचारी विद्यार्थी सर्वजण उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .जे एस गीताजे व सौ एम करडे यांनी केले तर आभार एम एस पवार यांनी मानले .