Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

राजेशखन्ना पानारी मुख्याध्यापक म्हणून यशस्वी कारकीर्द गाजवतील -दिलीप शिरढोणे

 राजेशखन्ना पानारी मुख्याध्यापक म्हणून यशस्वी कारकीर्द गाजवतील -दिलीप शिरढोणे



गणेशवाडी : गणेशवाडी येथील विद्या मंदिर गणेशवाडी (माळ)चे नवनियुक्त मुख्याध्यापक राजेशखन्ना पानारी यांचा मित्र परिवारांमार्फत सत्कार करण्यात आला. हरहुन्नरी कलागुणसंपन्न असणारे राजेशखन्ना पानारी यांची अध्यापक म्हणून उल्लेखनीय कारकीर्द झाली. वर्गाध्यापनाचे कामकाजाबरोबरच संगीताचे ज्ञान,सलग पाच वर्षे सांगली आकाशवाणीवर बालोद्यान कार्यक्रम सादर करणारे शिक्षक, शालेय पोषण आहारांतर्गत उत्कृष्ट परसबाग निर्मितीत हातखंडा,सेंद्रीय शेती व वृक्षारोपणाची आवड, बॅ. खर्डेकर पतसंस्थेचे माजी व्हाईस चेअरमन अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले आहेत. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे मुख्याध्यापक म्हणून यशस्वी कारकीर्द गाजवतील असा ठाम विश्वास दिलीप शिरढोणे यांनी व्यक्त केले.

           गणेशवाडी शाळेत जडणघडण घडली आपल्या शाळेचे ऋण फेडण्याची संधी मुख्याध्यापक म्हणून प्राप्त झाली. ती निश्चितपणे पार पाडण्याचा कसोशीने प्रयत्न करू.असा ठाम विश्वास राजेशखन्ना पानारी यांनी सत्काराप्रसंगी व्यक्त केले.

              याप्रसंगी सुप्रसिध्द लेखक व वैद्य अशोक गायकवाड,साने गुरुजी शिक्षक पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन मेहबूब मुजावर,शिरोळ तालुका पतसंस्थेचे संचालक अशोक कोळी,बाळासो कोळी,अल्लाबक्ष नदाफ,रियाज बाणदार,जयानंद बेरड,विनोद माने,सुनिल कोळी उपस्थित होते.