राष्ट्रीय काँग्रेस कमिटी व गणपतराव दादा पाटील प्रेमी दत्तवाड यांच्या वतीने गुणवंतांचा सत्कार समारंभ संपन्न.
राष्ट्रीय काँग्रेस कमिटी व गणपतराव दादा पाटील प्रेमी दत्तवाड यांच्या वतीने गुणवंतांचा सत्कार समारंभ संपन्न.
दत्तवाड चे सुपुत्र अक्षय अशोक नेरले यांनी यु पी एस सी परीक्षेमध्ये उत्तुंग भरारी घेतल्याबद्दल त्यांचा कुरुंदवाड विभागाचे पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार संपन्न झाला .यावेळी दतवाड मधील दहावी ,बारावी तसेच इतर विभागात उत्तुंग यश प्राप्त केलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून माननीय पोलीस निरीक्षक भांगे साहेब हे उपस्थित होते त्याचबरोबर दत्तवाड ग्राम विकास सोसायटीचे चेअरमन मलगोंडा पाटील ,व्हॉइस चेअरमन विरुपाक्ष हेरवाडे, जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस उदय पाटील ,ग्रामपंचायत सदस्य देवराज पाटील, बाबुराव पवार, सौ ज्योती पाटील ,सौ सीमा पाटील ,त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते एन.एस. पाटील ,बाबुराव पाटील, इरगोंडा पाटील, प्रमोद पाटील ,अमित माने ,राजू गुमटे ,कुमार पाटील, हे उपस्थित होते
यावेळी अक्षय नेरले यांच्यासोबत प्रज्ञा कलगोंडा पाटील ,सोनाली संजय आंबूपे, गायत्री कुरुंदवाडे ,अनुष्का देवराज पाटील, शुभम चंद्रकांत शिरनाळे पैलवान , त्याचबरोबर दिशा चिगरे यांचाही सत्कार करण्यात आला.
प्रारंभी स्वागत मलगोंडा पाटील यांनी केले ,प्रास्ताविकामध्ये शेखर कलगी यांनी सविस्तर माहिती दिली ,श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्या मार्फत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ,सुसज्ज लायब्ररी, त्याचबरोबर श्रीदत्त पॉलिटेक्निक कॉलेज, श्रीदत्त आयटीआय ,आणि कारखान्याच्या मार्फत इतर सर्व सुविधा ज्या उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांनी त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आदरणीय गणपतराव पाटील दादांनी सर्व विद्यार्थ्यांना आव्हान केलं आहे .असे ते म्हणाले एन एस पाटील, सुरेश पाटील ,उदय पाटील ,गायत्री कुरुंदवाडे यांनी मनोगत व्यक्त केले .अक्षय नेरले यांनी सत्काराला उत्तर देत असताना दतवाडच्या भूमी मधून मी देश सेवा करण्यासाठी रुजू होत आहे ,आणि आपल्या सर्व जनतेच्या आशीर्वादामुळे मी इथपर्यंत पोहोचलो हे भावपूर्ण उद्गार त्याने काढले. भांगे यांनी मार्गदर्शन केले व या सत्कार समारंभाचे आणि कमिटीचे कौतुक केले . राजू पाटील यांनी आभार मानले.