श्री विद्यासागर हायस्कूल अकिवाट येथे मुल्ला यांचा निवृत्ती समारंभ संपन्न
श्री विद्यासागर हायस्कूल अकिवाट येथे मुल्ला यांचा निवृत्ती समारंभ संपन्न
श्री बाहुबली विद्यापीठ संचलित श्री विद्यासागर हायस्कूल अकिवाट येथे नियत वयोमानानुसार निवृत्त होणाऱ्या गणित अध्यापक अयुब. अ.रहेमान मुल्ला सरांचा सदिच्छा समारंभ साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. बाहुबली विद्यापीठ ,बाहुबलीचे संचालक गोमटेश बेडगे होते . प्रमुख उपस्थितीमध्ये सचिव व्हि. जी मलिकवाडे ,.सहसचिव एस.बी. चौगुले , विद्यासागर हायस्कूलचे शालेय समितीचे चेअरमन कमलाकर चौगुले हे उपस्थित होते .प्रमुखवक्ते निसर्गमित्र भास्कर शिंदे यांनी आपल्या भाषणात मलादेखिल मुल्ला सरासारखे सर मिळाले असते तर खूप शिकता आले असते व आपल्या खडतर परिस्थितीतून मार्ग काढले व यशस्वी झाले हे सांगितले.याप्रसंगी शाळे मार्फत संस्थेमार्फत व मित्र परिवार व पाहुणे मार्फत मुल्ला सर व त्यांची पत्नी यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले.विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक डी.बी. वाडकर यांनी केले प्रमुख पाहुणे यांचा परिचय श्री .पी व्ही. नांद्रे यांनी केले. याप्रसंगी श्री . सुहास बेडक्याळे यांनी मानपत्राचे वाचन केले.
सर्व शाळांच्या प्रतिनिधींनी व विद्यार्थ्यांनीही मुल्ला सरांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थी मनोगतात श्रावणी चौगुले हिने सरांबद्दलच्या आठवणी सांगितल्या. अध्यापक डी. ए.सरडे यांनी मनोगत व्यक्त केले.
आप्तेष्ट मधून राजू जुगळे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रम प्रसंगी सत्कार मूर्ती आयुब मुल्ला सर यांनी आपले गत अनुभव सांगितले हे सांगताना ते अतिशय भावनिक झाले होते.
गोमटेश बेडगे यांनी शुभेच्छा दिल्या. आभार श्री एम. एस. पवार यांनी मानले. सुत्रसंचलन पी ए भोकरे व जे. एस. गिताजे यांनी केले. याप्रसंगी शालेय समितीचे सर्व सदस्य पत्रकार रमेश मेठारे व गणपती कागे,ग्रामस्थ , माजी विद्यार्थी ,सर्व अध्यापक, अध्यापिका ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.