टाकळीवाडीतील बाजीराव गोरे समाजसेवक करताहेत निस्वार्थपणे गावाला पाणीपुरवठा करतात
बाजीराव गोरे समाजसेवक करताहेत निस्वार्थपणे गावाला पाणीपुरवठा करतात
श्री गुरुदत शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी ठरतंय वरदान
टाकळीवाडी तालुका शिरोळ येथे गावाला नदी नाही. अशातच यावर्षी पावसाने दांडी मारल्यामुळे गावातील ,विहीर ,बोर यांना पाणी कमी आले आहे. काही जणांची बोर, विहीर बंद पडली आहेत.
गावामध्ये पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलेला आहे. समाजसेवक बाजीराव गोरे या समाजसेवकांनी स्वतः टँकर भाड्याने आणून श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी च्या सहकार्याने गावाला पाणीपुरवठा करत आहे.
आणि विशेष म्हणजे जेवढे पाणी हवे तेवढे तेवढा पाणीपुरवठा घरोघरी जाऊन करतायेत. टँकरला मोटर लावण्याची सुद्धा परवानगी दिलेली आहे.
सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी चे चेअरमन मा.श्री.महादेवरावजी घाटगे (साहेब )व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मा.राहुल घाटगे (दादा)नेहमी सामाजिक बांधिलकी जपतआहे.
माजी सरपंच सौ चंद्रकला बाजीराव गोरे यांच्या कारकिर्दीत कोरोना काळात सुद्धा यांनी मोलाचे योगदान केले होते.
गावामध्ये कोणतीही अडीअडचणी असो लगेच मदतीला धावून येतात. हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. स्वतःहे टँकर बरोबर घरोघरी फिरत असून पाणी घ्या पाणी अशी हाक देत आहेत.यांचे कौतुक होत आहे.
महिलांना जो पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता तो थांबलेला आहे. महिला वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. समाजसेवक असावा तर असा अशी महिलांच्या तोंडातून शब्द येत आहेत.