शाळेच्या भौतिक सुविधा सह शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी संगणक कक्ष, ई लर्निंग सारख्या सुविधा --वैशाली वर्णेकर
सैनिक टाकळी (प्रतिनिधी)
रोटरी क्लब ऑफ पुणे विजडम ने शाळेच्या भौतिक सुविधा सह शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी संगणक कक्ष, ई लर्निंग सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत . त्याचा वापर विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे करून घेतला पाहिजे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ पुणे विजडम च्या प्रेसिडेंट वैशाली वर्णेकर यांनी केले. त्या येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये रोटरी क्लब ऑफ पुणे विजडम यांच्या कडून रुफ दुरुस्ती, ई लर्निंग सॉफ्टवेअर , बेंचस प्रदान प्रसंगी बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष एस वाय पाटील होते . प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक विनोद पाटील यांनी शाळेच्या शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात रोटरी क्लब पुणे विजडम यांचा मोलाचा वाटा असुन भवानीसिंग घोरपडे यांच्या प्रयत्नाला यश आले असल्याचे मत व्यक्त केले .सैनिक परंपरा असलेल्या गावासाठी रोटरी क्लबने विद्यार्थ्यांना डिजिटल शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्याने दर्जेदार शिक्षण मिळेल याची ग्वाही दिली. यावेळी संस्थेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व एम एम धुमाळे यांनी केले. यावेळी रो.हेमंत पुराणिक,रो. राजेश वाडेकर, माधव धायगुडे ,विशाखा धायगुडे ,योगिनी जोगळेकर, शिरीष लिमये, संस्थेचे संचालक रामचंद्र पाटील पी.जी .पाटील ,मुख्याध्यापिका एस ए अंबूपे, यांच्या सह शिक्षक उपस्थित होते सुत्रसंचालन उदय पाटील यांनी केले तर आभार आर एस. खोपडे यांनी मानले.