कुरुंदवाड येथील माऊली महिला संस्थेने हजारो गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेनचे वाटप
*कुरुंदवाड येथील माऊली महिला संस्थेने हजारो गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेनचे वाटप
कुरुंदवाड(प्रतिनिधी) सुनील कानडे
कुरुंदवाड येथील माऊली महिला सेवाभावी संस्थेने हजारो गरजू विद्यार्थ्यांना शाहू जयंतीनिमित्त वह्या, पेन आणि पेन्सिल आशा शालेय साहित्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली
कुरुंदवाड येथील गेली अनेक वर्षे महिला आणि गरजू विद्यार्थिनींच्या साठी काम करत असलेल्या माऊली महिला सेवाभावी संस्थेतील महिलांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कुरुंदवाड, तेरवाड या गावातील विविध शाळांमधील हजारो गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणले. इतक्या मोठया प्रमाणात हाजारो विद्यार्थांना प्रत्येकी अर्धाडझन वही, दोन पेन, दोन पेन्सिल, पट्टी अशा प्रकारचे शालेय साहित्य वाटपचा कार्यक्रम प्रथमच झाला असुन कुरुंदवाड येथील महिला संस्थेने राबवलेल्या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांच्यातून कौतुक होत आहे
गरीब आणि गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप, त्यांचा शिक्षणाचा खर्च आणि गरजू युवतींच्या विवाहाचा खर्च देखील गेली अनेक वर्षे या माऊली महिला सेवाभावी संस्थेकडून केले जाते. गेल्या महिन्याभरापासून 'एक वही गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी' असे आव्हान या महिला संस्थेकडून करण्यात आले होते. त्याला आणि अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत वह्या आणि शालेय साहित्य या संस्थेकडे जमा केले होते. काल राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती निमित्त कुरुंदवाड येथील सर्व शाळासह तेरवाड आश्रम शाळा येथील शाळेमध्ये जाऊन साहित्याचे वाटप करण्यात आले. अनेक दानशूर व्यक्तींनी या उपक्रमाला मोठा हातभार लावला होता. शाहू जयंती दिवशी माऊली महिला संस्थेने केलेल्या आव्हानाला सहकार्य करणाऱ्या नागरिकांच्या वतीने या शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी बी बी सुर्यवंशी सर, उमेश आवळे, सुनिल जुगळे, रविकुमार पाटील सर, बाबासाहेब सावगावे, संजय दिवटे, दीपक परीट, संदीप व्होरा, केदार पाटुकले, राजमाने सर,वैशाली जुगळे, भाग्यश्री भुई यांच्यासह माऊली संस्थेच्या अध्यक्षा भाग्यश्री अडसूळ, उपाध्यक्षा वैशाली कुरणे, सचिव सुजाता जाधव,संचालिका शीतल महाडिक,अनुजा साळुंखे, दिपा सावंत,रूपाली कानडे, दिपाली कांबळे, वैशाली गायकवाड, आरती आडसुळ,पूजा कारंजकर, मंदा देशपांडे, यांचेसह विविध शाळेतील शिक्षक आणि नागरिक उपस्थित होते.