संतरूप दर्शन दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
कुरुंदवाड (प्रतिनिधी):--
येथील शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडच्या कै. डॅा.रामचंद्र विठ्ठल फडणीस व कै. सौ. जानकीबाई रामचंद्र फडणीस प्राथमिक विद्या मंदिर कुरुंदवाड (ता.शिरोळ) आषाढी एकादशी निमित्त , संतरूप दर्शन दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
संत वारकऱ्यांच्या वेशभूषेत सर्व बालचमू या कार्यक्रमात सहभाग झाले होते. पंढरीची मांदीयाळी कुरुंदवाड नगरीत अवतरली होती असे सर्व नागरिकांना वाटत होते.या कार्यक्रमाला यश पाटुकले स्टेशनरीचे प्रोपायटर मा.श्री. ओंकार प्रदीप पाटुकले हे उभयता उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले की वेगवेगळ्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास घडत असते. ही दिंडी रामचंद्र रोड,काळाराम मंदिर, बाजारपेठ मार्गे विठ्ठल मंदिर या ठिकाणी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पोहोचली ठिकठिकाणी मुख्य चौका- चौकात अध्यापिका भोई यांनी दिग्दर्शित केलेले विठ्ठलाचे गीत बालचमूने सादर केले. विठ्ठल मंदिर या ठिकाणी गेल्यानंतर आरती , झिम्मा-फुगडी अशा खेळात वारकरी, विद्यार्थी भक्तीरसात चिंब भिजून गेले. त्यानंतर प्रसाद वाटप करून पुनश्च दिंडी शाळेकडे प्रस्थान झाली. गावातील बहुसंख्य पालक , वारकरी , भक्त मंडळी या दिंडीत सहभागी झाले होते. कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन मा.प्रा.श्री.शरदचंद्र पराडकर व संस्थेच्या सेक्रेटरी मा.सौ.सीमा जमदग्नी यांची प्रेरणा व स्फूर्ती मिळाली .
यावेळी मुख्याध्यापिका सौ.नलिनी काळे, सौ.कांचनमाला बाबर , श्री.विद्यासागर उळागड्डे. अनिल पांडव , श्री. दत्तात्रय कुरुंदवाडे , कु.अनिता भोई , कु.मिरामा बाणदार , सुनिल पवार , सौ.रेखा औरवाडे , श्रीमती मालूताई गुरव , श्रीमती सुनिता स्वामी एस.पी. हायस्कूलचे अध्यापक श्री माने सर, माजी पर्यवेक्षिका श्रीमती पी.एच.कुलकर्णी शिक्षक व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.