जैन मुनींच्या हत्येप्रकरणी घोसरवाड येथे मूक मोर्चा* गावकऱ्यांच्या वतीने भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
*जैन मुनींच्या हत्येप्रकरणी घोसरवाड येथे मूक मोर्चा*
गावकऱ्यांच्या वतीने भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
श्री १०८ कामकुमारनंदी महाराज यांची हिरेकुडी येथे हत्या प्रकरणी श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर कमिटी घोसरवाड, यांच्या मार्फत गावात मूक मोर्चा काढून गाव कामगार तलाठी श्री जलबा मेटकर यांना सकल दिगंबर जैन बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आला. व घडलेल्या घटनेबद्दल जाहीर निषेध केला. यावेळी पार्श्वनाथ दिगंबर जैन कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री धनपाल जुगळे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले जैन धर्म अहिंसा तत्त्वाचे पालन करीत असतो, व नेहमी मानवता धर्माला एक चांगली अहिंसेचा मार्ग दाखवून, प्रत्येक समाजाला सुसंस्कृतेची चांगली निर्मिती केली जात आहे. असे असून देखील अहिंसा तत्त्वाने जाणाऱ्या जैन मुनि महाराजांची हत्या होणे म्हणजे जैन समाजातील मुनी परंपरेला धोका निर्माण होय. यासाठी घडलेल्या घटनेबद्दल जानी निर्गुण हत्या केली त्यांना कठोर कारवाई व्हावी अशी यावेळी मागणी केली.
यावेळी दिगंबर जैन कमिटीचे उपाध्यक्ष कुमार मुरगुंडे, पोलीस पाटील अजित खोत, कोतवाल राम शिंदे, सेक्रेटरी गणपतराव शेट्टी, अभय बारवाडे, सुरेश मगदूम, गोटू मगदूम, मयूर जुगळे, राहुल मगदूम, सोनल मगदूम, राजेंद्र बारवाडे, भरत जुगळे, महावीर कुंभोजे, संजय बस्तवाडे, कल्लाप्पा बस्तवाडे, विद्याधर बारवाडे, सुरेश बारवाडे, महिला अध्यक्षा त्रिशाला शेट्टी, अमृता बस्तवाडे, शालन मगदूम, सुजाता अकिवाटे, अरुणा बारवाडे, संगीता बारवाडे, निकिता बारवाडे, मोहिनी मगदूम व सकल जैन समाजातील श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.