Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

प्राथमिक शाळेतील स्पर्धा परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात उपयोगी पडते -एस एस गजरे

 दत्तवाड --- 



जग स्पर्धेचे आहे त्यामुळे सर्वच स्पर्धा परीक्षेला मुलांना बसवून त्यांची तयारी करून घ्या. यामुळे मुलांची सर्व विषयाची तयारी होते मुलात निकोप स्पर्धेत सहभागी होण्याची सवय होते याचा त्यांना पुढील आयुष्यात फायदा होतो याबरोबरच सध्या मुलांमध्ये मोबाईलचे वेड जास्त असून मोबाईल पासून मुलांना दूर ठेवा त्यांच्याशी संवाद साधून त्यांना वेगवेगळ्या उपक्रमात गुंतवून ठेवा. असे प्रतिपादन एस एस गजरे यांनी केले त्या  लठ्ठे एज्युकेशन सोसायटी संचलित पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा दत्तवाड ता शिरोळ. येथील पहिल्या पालक सभेत त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शाळेचे चेअरमन अजित चौगुले  होते. तर श्रीमती अक्काताई नाना नेजे हायस्कूलचे  पर्यवेक्षक डी बी. रायनाडे प्रमुख उपस्थित होते.

          गजरे यांनी   गणित विषय सोपा होण्यासाठी अबॅकस या पद्धतीचा वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या असे सांगितले तर स्पर्धा परीक्षेच्या तयारीत पालकांनी मुलांना कसे तयार करावे याच्या काही गोष्टी  पालकांना  सांगितल्या.
            मागील वर्षी विविध स्पर्धा परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. याचे वाचन प्रियांका वठारे यांनी केले.
        कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने झाली. मुख्याध्यापक अभिजीत मालगावे व मंदा देशपांडे यांनी मनोगते व्यक्त केली. पाहुण्यांचा परिचय पल्लवी गळगे यांनी केले स्वागत प्रास्ताविक सारिका  शिंदे यांनी केले तर आभार संजीवनी हेरवाडे यांनी मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माया धुमाळे यांनी केले