गुरुदत्त शुगर्स च्या यशस्वी घौडदौडीत कर्मचारी वर्गाचा सिंहाचा वाटा-माधवराव घाटगे
टाकळीवाडी -
गुरुदत्त शुगर्स च्या यशस्वी घौडदौडीत कर्मचारी वर्गाचा सिंहाचा वाटा असून त्यांनी दिलेल्या योगदानामुळे महाराष्ट्रातील साखर कारखानदारीत गुरुदत्त शुगर्स चे नाव राष्ट्रीय पातळीवर गौरवले गेले असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी केले.कारखाना कार्यस्थळावर सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार समारंभ व कारखान्याचे संस्थापक कै.भगवानराव घाटगे यांच्या जयंती समारंभ अशा संयुक्त कार्यक्रम प्रसंगी श्री.घाटगे बोलत होते.
पुढे बोलताना श्री.घाटगे म्हणाले, कोणत्याही संस्थेच्या प्रगतीत तेथील कर्मचारी व अधिकारी यांचे मोलाचे योगदान असते.गुरुदत्त शुगर्स चे कर्मचारी यांनी येथे काम करीत असताना प्रत्येक काम आपलं म्हणून केले. कर्मचारी वर्गाचे ‘गुरुदत्त शुगर्स वरती असणारे प्रेम,निष्ठा व प्रामाणिकपणा या त्रिसुत्रीमुळे कारखान्याची यशस्वी वाटचाल चिरंतर राहिली आहे .कारखान्याचे मयत कर्मचारी अजित निर्मळे (टाकळीवाडी) व नाविद दानवाडे( राजापूर) यांच्या वारसांना कारखानाच्या वतीने ५ लाख रुपयांचा धनादेश चेअरमन माधवराव घाटगे यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी मान्यवरांच्या हस्ते संस्थापक – कै. भगवानराव घाटगे यांच्या फोटोचे पुजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.तसेच त्यांच्या जयंतीनिमित्त टाकळीवाडी येथे १००० चिकु रोपाचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेबदल माजी जि.प. सदस्य राजवर्धन नाईक – निंबाळकर यांचा सत्कार चेअरमन माधवराव घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाला गुरुदत्त शुगर्स चे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर राहूल घाटगे,माजी जि.प.सदस्य अशोकराव माने,विजय भोजे,कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे,माजी नगरसेवक उदय डांगे,दत्त नगरी पत संस्थेचे चेअरमन शिवाजीराव माने- देशमुख,चिंचवाडचे माजी सरपंच विठ्ठल घाटगे,कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष वैभव उगळे,भाजपचे किसान मोर्चाचे कोषाध्यक्ष अन्वर जमादार,शिवाजी सांगले,चिंचवाडचे सरपंच जालिंदर ठोमके व सर्व ग्रा.प. सदस्य,सुरेश सासणे,सदाशिव आंबी, अशोक जगताप, मुकुंद गावडे,महेश देवताळे,गुरुदत्त शुगर्स,दत्त नागरी पत संस्था व कै. भगवानराव घाटगे सेवा सोसायटी आदी संस्थाचे संचालक मंडळ,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.आभार गुरुदत्त शुगर्स चे संचालक बाळासाहेब पाटील यांनी मानले