Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

औरवाडमध्ये उद्यापासून सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण वाचन व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन .

 औरवाडमध्ये उद्यापासून सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण वाचन व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन .


(प्रतिनिधी) :-औरवाड (ता. शिरोळ) येथील मराठा सांस्कृतिक भवन मध्ये सोमवार दि. 24 ते 30 जुलै अखेर सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

 सप्ताहाचे हे तिसरे वर्ष असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

यामध्ये सोमवारी दि. 24 रोजी सकाळी साडेसात वाजता सामुदायिक ज्ञानेश्वरी वाचनास सुरुवात होईल. तसेच दुपारच्या सत्रात भजन व रात्रीच्या सत्रात कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे .

यामध्ये सोमवार दि. 24 रोजी दुपारी दोन वाजता माऊली महिला भजनी मंडळ( औरवाड) यांचे भजन. रात्री नऊ वाजता ह. भ. प .ज्ञानेश्वर माने महाराज( हेरवाड) यांचे कीर्तन. मंगळवार दि. 25 रोजी  दुपारी दोन वाजता तुकाराम महाराज भजनी मंडळ (कवठेगुलंद )यांचे भजन, रात्री नऊ वाजता ह. भ. प. पार्थ महाराज पाटील गुरुकुल (आंबेघर) यांचे कीर्तन. बुधवार दि. 26 रोजी दुपारी दोन वाजता भजन ,रात्री नऊ वाजता ह. भ. प .आबालाल नदाफ पिंजारी महाराज (यळगुड ) यांचे कीर्तन. गुरुवार दि. 27 रोजी दुपारी दोन वाजता श्री दत्त अमरेश्वर भजनी मंडळ (औरवाड) यांचे भजन, रात्री नऊ वाजता ह. भ. प .बाबासो रायमाने महाराज (नांदणी) यांची कीर्तन. शुक्रवार दि.28 रोजी दुपारी दोन वाजता भजन ,रात्री नऊ वाजता ह. भ. प. विनायक चौगुले महाराज (खोची) यांचे यांचे कीर्तन. शनिवार दि. 29 रोजी दुपारी दोन वाजता माऊली बाल भजनी मंडळ (कवठेगुलंद) यांचे भजन, रात्री नऊ वाजता ह. भ. प .किशोर भाट महाराज (कुरुंदवाड) यांचे कीर्तन होईल .रविवार दि. 30 रोजी सकाळी सात वाजता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा, आठ वाजता ह. भ. प. प्रवीण महाराज शेलार आंबेघर यांचे काल्याचे किर्तन, सकाळी नऊ वाजता दिंडी प्रदक्षिणा ,अकरा वाजता महाप्रसाद होईल.

श्री.चैतन्य सदगुरु ह.भ.प.तात्यासाहेब बाबासाहेब वास्कर महाराज (आबा)यांच्या आशिर्वादाने होत असलेल्या सप्ताहाचे 

 ज्ञानेश्वरी पारायण व व्यासपीठ प्रमुख ह. भ .प .गुरुकुल श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था क्षेत्र आंबेघर हे आहेत.

  यानिमित्त फोटो पुजन श्री.रमेश रावण( चेअरमन,अमरापुर विकास सेवा संस्था.औरवाड.),विना पुजन ह.प.भ.दत्तात्रय गावडे व ह.भ.प.बाबुराव लोहार,ध्वज पुजन श्री.मारुती गावडे (सोनाली उद्योग समुह),व श्री.दिलीप मंगसुळे,ग्रंथ पुजन सौ.परवीन दादेपाशा पटेल (जि.प.सदस्य ), सौ.वदंना रविंद्र गावडे (उपसरपंच,औरवाड),कलश पुजन -श्री.सुकुमार सुतार( उद्योजक),श्री. बाळासो आवळेकर,यांच्या हस्ते होईल. 

प्रमुख उपस्थिती महमंदशफी अलीमुर्तजा पटेल (सरपंच,) ग्रामपचांईत औरवाड सर्व सदस्य,अमोल बापुसो कोले (पोलीसपाटील).असणार आहे.

  सप्ताहाचे आयोजन औरवाड येथील माऊली महिला भजनी मडंळ ,सर्वश्री नारायण गावडे,दत्तात्रय आवळेकर,अरुण एंरडोंले,रामदास गावडे,अवधुत रावण,दिलीप मंगसुळे यांनी केले आहे.

 सप्ताहाकाळातील सर्व धार्मिक कार्यक्रमाचा भाविकानी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच ज्ञानेश्वरी  पारायण व महाप्रसाद अन्नदानासाठी धान्य,पदार्थ,वस्तु,देणगीसाठी भाविकांनी संयोजकाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.