Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

कुरुंदवाडच्या फडणीस विद्या मंदिर मध्ये शिक्षक-पालक मेळावा उत्साहात संपन्न.

 कुरुंदवाडच्या फडणीस विद्या मंदिर मध्ये शिक्षक-पालक मेळावा उत्साहात संपन्न.



कुरुंदवाड ता. 22 :येथील शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडच्या कै.डॅा.रामचंद्र विठ्ठल फडणीस व कै.सौ.जानकीबाई रामचंद्र फडणीस प्राथमिक विद्या मंदिर कुरुंदवाड , चंद्रकला बालक मंदिर व ताराबाई दुंडाप्पा गवळी बालक मंदिर असा संयुक्त पालक मेळावा गणपती मंदिरात संपन्न झाला.

         या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त अध्यापक . विलास सुबाना पानकर हे  होते. तर मार्गदर्शक  अशोक लक्ष्मण गायकवाड व  संस्थेच्या सेक्रेटरी  सीमा जमदग्नी  विश्वस्त श्रद्धा कुलकर्णी  उपस्थित होत्या.

         या कार्यक्रमांच्या सुरुवातीला शाळेतील ज्येष्ठ  अध्यापिका  बाबर  यांनी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेची वेळ , शाळेची शिस्त याबद्दल माहिती सांगितले त्याचबरोबर नवीन येऊ घातलेल्या एफ एल  एन अभ्यासक्रम बाबत सविस्तर माहिती सांगितले.

            मार्गदर्शक अकिवाट गावचे प्रथितयश अर्धांगवायूचे वैद्य गायकवाड  असे म्हणाले की पूर्वीचा गावगाडा आणि आजची परिस्थिती यामध्ये फार फरक आहे .पूर्वीच्या काळातील संस्कार व संस्कृती कडे डोळसपणे पाहिले पाहिजे. शेतकरी राबल्याशिवाय काही मिळत नाही. विद्यार्थी व पालकांनी मोबाईल , टी.व्ही. चा योग्य वापर करावा. मुले शिकून मोठी व्हावीत. त्यांना पंख मिळवून त्यांच्या कक्षा रुदांवेत यासाठी शिक्षकांच्या बरोबर पालकांनीही आपल्या पाल्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे असे मत व्यक्त केले.

       संस्थेचे सेक्रेटरी जमदग्नी  अनेक गोष्टीचा उहापोह केला. विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण द्यावे. पालकांच्यासाठी हिरकणीच्या माध्यमातून प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या मुलांसाठी हेल्दी फूड देणे व चांगल्या गोष्टी शिकवणे गरजेचे आहे. त्याशिवाय परिसरातील चांगल्या शाळांना पालकासह शिक्षकांनी भेटी देणे आवश्यक आहे. आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी शिक्षक आणि पालक यांच्यात संवाद असावा असे मत व्यक्त केले 

             अध्यक्षीय भाषणात सेवानिवृत्त अध्यापक पानकर  विद्यार्थ्यांच्या जडण घडणीत पालकांची पण जबाबदारी असते. विद्यार्थी हा १६ ते १७ तास घरात असतो. २४ तासांपैकी एक तास विद्यार्थ्यांच्या सोबत पालकांनी घालवावे. पालकांनी वाचन करणे आवश्यक आहे. त्या वाचनाचा उपयोग आपल्या पाल्याच्या संवादासाठी  करावा.हिंदी , इंग्रजी बातम्या विद्यार्थ्यासोबत पाहणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने त्यांच्या प्रदीर्घ सेवेतील अनुभव कथन केले.

       या सर्व कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन शरदचंद्र पराडकर  यांची प्रेरणा व स्फूर्ती मिळाली .

         प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका नलिनी काळे व त्यांचा सर्व स्टाफ चंद्रकला बालक  मंदिरच्या मुख्याध्यापिका नीला कुलकर्णी व त्यांचा सर्व स्टाफ त्याचबरोबर ताराबाई दुंडाप्पा गवळी बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका गायकवाड  व त्यांचा स्टाफ तिन्ही शाळांचे बहुसंख्य पालक वर्ग  उपस्थित होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे ज्येष्ठ अध्यापक  विद्यासागर उळागड्डे यांनी केले तर आभार अनिता भोई यांनी मानले.