विद्यार्थ्यांनी वाचनाचा छंद जोपासावा " विपिन मोहित श्रीवास्तव
सैनिक टाकळी (प्रतिनिधी)
डॉर्बिट फाऊंडेशन ने कमिन्स इंडिया फांऊंडेशनच्या माध्यमातून समृद्ध वाचनालय शाळेसाठी उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचा देखील समावेश आहे.याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे असे प्रतिपादन डॉर्बिट फाउंडेशनचे संस्थापक विपिन मोहित श्रीवास्तव यांनी केले.ते येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये समृद्ध वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव राजेश पाटील होते. ते पुढे म्हणाले वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडत जाते. याचा उपयोग आपल्या भावी आयुष्यासाठी होऊ शकतो यासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचनाचा छंद जोपासावा असे आवाहन त्यानी यावेळी केले. प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक विनोद पाटील म्हणाले शाळेच्या भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात स्वंयसेवी संस्थेंचा मोलाचा वाटा आहे. वाचनालया मुळे विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचनाची गोडी निर्माण होईल. विद्यार्थी याचा नक्कीच वापर करतील याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला .
हा प्रकल्प पुर्ण करण्यासाठी अभिलाष शास्त्री,रोहित कुसनाळे, अभिषेक सिंह , आशुतोष पाटील,वैभव पाटील यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले
दरम्यान डॉर्बिट फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी एनसीसी कॅडेट समवेत येथील शहीद जवान स्मारकास अभिवादन केले.
यावेळी अंजली शास्त्री, रौशन कुमार, गुरुप्रसाद साजने,विराज पाटील, माजी मुख्याध्यापक आर.डी.पाटील, संजय पाटील, एस.वाय पाटील, रामचंद्र पाटील ,पी.जी .पाटील , उदय पाटील, एस ए अंबूपे, यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते .
.कार्यक्रमाचे स्वागत एम एम धुमाळे यांनी केले आभार आर एस. खोपडे यांनी मानले.