फडणीस विद्या मंदिर मध्ये " दीप अमावस्या " संपन्न.*
दत्तवाड
*फडणीस विद्या मंदिर मध्ये " दीप अमावस्या " संपन्न.*
कुरुंदवाड ता.१७ :-
येथील शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडच्या कै. डॅा.रामचंद्र विठ्ठल फडणीस व कै.सौ.जानकीबाई रामचंद्र फडणीस प्राथमिक विद्या मंदिर कुरुंदवाड मध्ये दीप अमावस्या मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात संपन्न झाली.
.सौ. मेघा सुरेश बिरंजे व संस्थेच्या सेक्रेटरी सौ.जमदग्नी मॅडम यांच्या शुभहस्ते दीप पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी सौ बिरजे म्हणाल्या की शाळेतील विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास होते.
रांगोळी ची आरास करून त्यावर विद्यार्थ्यांनी् घरातून आणलेल्या दीव्यानी अत्यंत भक्ती भावाने दिव्यांचे पूजन करण्यात आले .
उळागड्डे सरांनी दिव्याची माहिती सांगत असताना अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले श्रावणाच्या पूर्वसंध्येला येणारा अमावस्या म्हणजे दीप अमावस्या .आपल्या भारतीय संस्कृतीत दिव्याला , अग्निपूजनला अनन्य साधारण महत्त्व आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हा दीप आपल्या प्रकाशाची वाट उजळत असतो.दिवा हा अग्नीचे किंवा तेजाचे एक रूप . देवाची पूजा निरंजनाशिवाय होत नाही.
पूर्वी दिव्याची तेलवात ठेवण्याची खोलगट दगड , शिंपली नारळाची करवंटीचा उपयोग होई .यानंतर खापराची पणती आली. कालांतराने धातूंची दीप पात्रे आली. मग समईची उत्क्रांती झाली पुढे कलात्मक पद्धतीने दीपवृक्ष , अर्चनादीप , निरांजन फुलवात , पंचारती , नंदादीप , दीपलक्ष्मी , लामणदिवा , आकाशदीप असे अनेक प्रकार आले .
कार्यक्रमाची सांगता जमदग्नी मॅडमांच्या मंगलमय वातावरणात दिव्याच्या आरतीने झाली.
कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन शरदचंद्र पराडकर यांची प्रेरणा व स्फूर्ती मिळाली .
मुख्याध्यापिका नलिनी काळे, कांचनमाला बाबर,विद्यासागर उळागड्डे,अनिल पांडव,दत्तात्रय कुरुंदवाडे,अनिता भोई,सुनिल पवार,रेखा औरवाडे, मालूताई गुरव,सुनिता स्वामी,तसेच सर्व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिरामा बाणदार यांनी केले