Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

दूधगंगा काठचे पाणी पेटले 11 ऑगस्ट रोजी पाच गावे बंद ठेवून लाक्षणिक उपोषण

दत्तवाड -


 इचलकरंजी शहराला मंजूर झालेली सुळकुड पाणी योजना रद्द करावी या मागणीसाठी शुक्रवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी दत्तवाड सह टाकळीवाडी, जुने, नवे दानवाड, घोसरवाड या गावातील व्यवहार बंद ठेवून दतवाड येथील गांधी चौक येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

     दत्तवाड ता. शिरोळ येथे पाच गावच्या झालेल्या मेळाव्यात सदर घोषणा करण्यात आली मेळाव्याचे अध्यक्षस्थानी दत्तवाड चे सरपंच चंद्रकांत कांबळे होते.
        इचलकरंजी शहराला पंचगंगा व कृष्णा नदीचे पाणी असताना दूधगंगेचे पाणी देण्याचे कारण काय मागील वर्षभरात दतवाड घोसरवाड येथे दूधगंगा नदी आठ ते  नऊ वेळा कोरडी पडली होती त्यामुळे येथील पिकांसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता यावर्षी देखील काळमवाडी धरण गळतीमुळे सत्तर टक्के भरले असून दिवाळीनंतर पाणी कमी पडणार आहे. याच धरणावर गैबी बोगदा, कोल्हापूर शहराची थेट पाईपलाईन, गांधीनगर सह तेरा गावची पाणी योजना आहे . अजून कालव्यांचे काम पूर्ण झाले नसल्याने कालव्यातून पाणी सोडण्यात येत नाही ते काम सध्या शिरोळ तालुक्यात सुरू आहे ते पूर्ण झाल्यावर कालव्यातून शेतीला पाणी मिळणार आहे या सर्वांसाठी पाणी कमी पडत असतानाच इचलकरंजी शहराला जादा पाणी कुठून देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे शासनाने सदर योजना रद्द करावी अशी आमची ठाम भूमिका असल्याबद्दल एक दिवस गाव बंद करून उपोषण करून शासनाला जागा करण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीमार्फत देण्यात आली
     यावेळी दानवाड चे सरपंच डॉ. सी. डी . पाटील, घोसरवाड चे माजी सरपंच धनपाल जुगळे, टाकळीवाडी चे माजी सरपंच बाबासाहेब वनकोरे, जुने दानवाडचे विकास पाटील, शिरोळ पंचायत समितीच्या माजी सभापती मिनाज जमादार, बबनराव चौगुले, राजगौडा पाटील ,सुधाकर पट्टेकरी, अजित वठारे, संगीता विभूते, भैय्या चौगुले, मिलिंद देशपांडे  यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी घोसरवाड चे सरपंच साहेबराव साबळे ,नंदकुमार नाईक, भरत  पाटील, नूर काले, बाबुराव पवार, दतवाडच्या उपसंरपच मनीषा चौगुले, जुने दानवडच्या सरपंच वैशाली पाटील, टाकळीवाडी चे कुशाल कांबळे तुकाराम चिगरे पिमू जमादार  पोलीस पाटील संजय पाटील यांच्यासह पाच गावातील ग्रामपंचायत सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील यांनी मानले.


 दरम्यान कृती समितीने तालुक्यातील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित क्षारपड मुक्तीचे जनक गणपतराव पाटील यांची कारखाना स्थळी भेट घेऊन त्यांनाही 11 ऑगस्ट रोजी उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले त्यांनी या लढ्यात मी तुमच्याबरोबर असल्याचे सांगितले तर माजी आमदार उल्हास पाटील यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी सरपंच चंद्रकांत कांबळे उदय पाटील राजू पाटील रावसो पाटील मलगौड पाटील बाबुराव पोवार,एन एस पाटील विवेक चौगुले अशोक पाटील अमित माने विरगोडा पाटील सुरेश पाटील चंद्रशेखर कलगी उपस्थित होते.