थोर क्रांतिकारक व स्वातंत्र्य सैनिकांच्या आदर्श विचारांची समाजाला गरज : अनिलराव यादव शिरोळात क्रांती दिन उत्साहात माजी सैनिकांचा सत्कार
शिरोळ : प्रतिनिधी
:९ ऑगस्ट १९४२ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी इंग्रजांना चले जावची हाक दिली या स्वातंत्र्याचा चळवळीत आपल्या जीवाची पर्वा
न करता क्रांतिकारक व स्वातंत्र्य सैनिकांनी उडी घेतली त्यांच्या बलिदानामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या जीवाची बाजी लावून अनेक सैनिकांनी देशाचे रक्षण केले आहे अशा थोर क्रांतिकारक व स्वातंत्र्य सैनिकांच्या विचाराची समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे त्यांच्या स्मृतीला उजाळा मिळावा यासाठी गेल्या ३१ वर्षापासून एस टी स्टँड मित्र मंडळाच्या वतीने क्रांती दिन साजरा करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे असे प्रतिपादन शिरोळ तालुका भाजपा नेते अनिलराव यादव यांनी केले यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी क्रांती स्तंभास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले
येथील एस टी स्टँड मित्र मंडळाच्या वतीने बुधवारी क्रांती दिन साजरा करण्यात आला या समारंभात अनिलराव यादव हे बोलत होते शिरोळ तालुका सैनिक फेडरेशनचे संचालक शहाजी काळे शिरोळ शहर सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष संजय इंगळे यांच्या हस्ते क्रांती स्तंभाचे पूजन करण्यात आले यावेळी माजी सैनिकांनी मानवंदना देत स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहिली
यानंतर उपस्थित माजी सैनिकांचा मंडळाच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी क्रांती दिनाचे औचित्य साधत देशाचे रक्षण करण्यासाठी आपले आयुष्य घातलेल्या माजी सैनिकांचा सत्कार केल्याबद्दल सैनिक फेडरेशनच्या वतीने एसटी स्टँड मित्र मंडळाचे आभार मानण्यात आले
स्वागत व प्रास्ताविक मंडळाचे प्रमुख व ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब माळी यांनी केले यावेळी माजी सैनिक शंकर मेथे, सुधाकर आरदाळे, मोहन कोगे, दगडू कांबळे ,पोपट कांबळे, बबन गावडे, खंडेराव बारवाडकर, बापू मुल्ला, विजय पवार, हणमंत काळे, रामदास गावडे, दत्तात्रय गावडे ,कुमार ढाले ,संभाजी गावडे, विश्वास पाटील, अरविंद माळगे, शिवाजी कांबळे, सर्जेराव पाटील ,शिवाजी काळे लायन्स क्लब शिरोळचे अध्यक्ष सुनील देशमुख सेक्रेटरी भास्कर पाटील, खजिनदार अभिजीत गुरव झोन चेअरमन सचिन माळी, खादी ग्रामोद्योग संघाचे संचालक सुरेश गंगधर ,दत्त साखर कारखाना कामगार प्रतिनिधी अमर उर्फ नाना कदम एसटी स्टँड मंडळाचे पांडुरंग पवार, बाळासाहेब पाटील डी बी चव्हाण, पंडित पुंदे, म्हणतेस स्वामी हिरेमठ, सचिन कोळी, रणजीत पवार, परवेज मेस्त्री,राजु पुंदे ,मारुती कोळी शिवाजी चव्हाण शिवाजी पवार, यांच्यासह वडाप संघटनेचे सर्व सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यादव सोसायटीचे चेअरमन डी बी चव्हाण यांनी आभार मानले,,,,