राजाराम विद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सर्जेराव कांबळे तर उपाध्यक्षपदी सौ शितल जगदाळे यांची निवड
शिरोळ : प्रतिनिधी :
येथील राजाराम विद्यालय क्रमांक २ या शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सर्जेराव कांबळे यांची फेरनिवड तर उपाध्यक्षपदी सौ शितल अमरसिंह जगदाळे यांची निवड करण्यात आली आहे
राजाराम विद्यालयात शालेय व्यवस्थापन समिती गठीत करण्यासाठी पालक सभा घेण्यात आली या सभेत शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली निवड झालेल्या सदस्यांच्या सभेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली यामध्ये शाळेच्या प्रगतीसाठी नेहमीच पुढाकार घेतलेले विद्यमान अध्यक्ष सर्जेराव कांबळे यांना पुन्हा अध्यक्षपदाची संधी देण्यात आली तर उपाध्यक्षपदी सौ शितल अमरसिंह जगदाळे यांची निवड करण्यात आली नूतन पदाधिकाऱ्यांनी शाळेचे सर्व शिक्षक व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि पालक यांच्या समवेत शाळेची गुणवत्ता वाढवण्याबरोबरच भौतिक सुविधा पुरवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करून शाळेची प्रगती करण्याचे आश्वासन दिले
शालेय व्यवस्थापन समितीमध्ये अध्यक्ष - सर्जेराव राऊ कांबळे, उपाध्यक्ष - शितल अमरसिंह जगदाळे, सदस्य - नगरसेविका जयश्री प्रसाद धर्माधिकारी, सौ करुणा जनार्दन कांबळे, पत्रकार चंद्रकांत तुकाराम भाट, अच्युत श्रीपाद कुलकर्णी, मारुती रघुनाथ जाधव, गजानन जगन्नाथ सावंत, धनाजी भीमराव गावडे, रवींद्र संपतराव पाटील दत्तात्रय शंकर पुजारी, प्रियांका सुनील इंगळे, सारिका रामा सकट, त्रिशला सागर येळगुडे( शिक्षक प्रतिनिधी) अनुजा दत्ता पुजारी, (विद्यार्थी प्रतिनिधी) बुद्धम चंद्रकांत मोहिते, (विद्यार्थी प्रतिनिधी) मुख्याध्यापिका सौ नीता दत्तात्रय चव्हाण (सचिव),यांचा समावेश आहे