Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

सर्वाधिक महसूल जमा करण्यात शिरोळ दुय्यम निबंधक कार्यालय अग्रेसर : डी आर पाटील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा झाला सन्मान

शिरोळ : प्रतिनिधी


शिरोळ तालुका नेहमीच विविध क्षेत्रात अग्रेसर आहे. तालुक्यातील जनतेने विविध माध्यमातून शासनाच्या तिजोरीत कर जमा केला आहे. खरेदी विक्रीच्या तसेच अन्य दस्त नोंदीच्या  माध्यमातून शिरोळ तालुक्याने जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महसूल जमा केला आहे. ही बाब येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची पोच पावती आहे असे प्रतिपादन शिरोळ शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष डी आर पाटील यांनी केले.

येथील दुय्यम निबंधक  कार्यालयाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याबद्दल गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या हस्ते दुय्यम निबंधक सौ व्ही एन चोरघस्ती( गवंडी) यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार डी आर पाटील बोलत होते.

जिल्ह्यामध्ये १८ दुय्यम निबंधक कार्यालय आहेत .या कार्यालयाच्या माध्यमातून, खरेदी विक्री गहाणखत यासह विविध प्रकारचे दस्त नोंदवले जातात. या प्रक्रियेमध्ये मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्कच्या  माध्यमातून, जिल्ह्याला महसुल गोळा करण्याचे  प्रत्येक दुय्यम निबंधक कार्यालयाला उद्दिष्ट दिले होते. यामध्ये शिरोळ दुय्यम निबंधक कार्यालयाने १६७% महसूल इष्टांक पूर्ण केला. सुमारे २८ कोटी ५० लाख रुपयांचा महसूल शिरोळ तालुक्यातून शासनाच्या तिजोरीत जमा केला. हा जिल्ह्यातील इतर सर्व दुय्यम निबंधक कार्यालपेक्षा अधिक असल्याने, या कार्यालयाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

जिल्हा निबंधक तथा अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे व सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. दुय्यम निबंधक सौ व्ही. एन. चोरघस्ती (गवंडी) व लिपिक गंगाधर शिवाजी आंबटवाड  यांनी सन्मान चिन्ह स्वीकारले.दरम्यान आदर्श कर्मचारीचा पुरस्कार येथील क्लार्क गंगाधर शिवाजी आंबटवाड यांना देण्यात आला.  या कार्यालयाला दोन पुरस्कार प्राप्त झाल्याने, गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे व प्रा. प्रवीण चंदनशिवे यांच्या हस्ते गंगाधर अंबडवाड व दुय्यम निबंधक चोरघस्ती यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गुरुदत्त शुगर्सचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे व तालुक्यातील मुद्रांक विक्रेते व मुद्रांक लेखनिक अशोक सारडा, रावसाहेब जाधव, श्रीकांत जाधव नितीन कांबळे, इम्तियाज मोमीन ,संतोष पाटील, आयुब जमादार, सलीम बागवान, दिलीप वायचळ, नंदकुमार राजमाने, युनूस इनामदार, अरुण शिरहटी ,आनंद कांबळे धैरशील वनेरे, नेताजी पाटील, राजेंद्र कुंभार बाळासाहेब माळगे सुनील केरीपाळे यांच्यासह पक्षकार उपस्थित होते