इचलकरंजीला दुधगंगा नदीतून पाणी नाही-राजेंद्र पाटील यड्रावकर
दत्तवाड--
पंचगंगा प्रदूषण मुक्त करूनच इचलकरंजीला पाणी द्यावे याबरोबरच कृष्णा नदीची योजना सुरू आहे त्याची गळती काढावी व पाणी घ्यावे पाण्यासाठी इतर नेत्यांमध्ये भांडण लावू नये दूधगंगा कृती समिती सोबत मी सदैव आहे असे प्रतिपादन माजी मंत्री व शिरोळ चे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
इचलकरंजीला खरंच पाण्याची गरज आहे का राजकारणासाठी सुळकूड पाणी योजना आहे हे तेथील राजकर्त्यांनी स्पष्ट करावे पाण्यासाठी राजकारण करू नये शुद्ध पाणी हा सर्वांचा अधिकार आहे शिरोळ तालुक्यातील जनतेला शुद्ध पाणी मिळाले पाहिजे त्यासाठी रस्त्यावर व सभागृहात दोन्ही ठिकाणी भांडण्यासाठी मी सदैव तयार आहे असेही ते म्हणाले .
दत्तवाड ता. शिरोळ येथे दूधगंगा कृती समितीमार्फत झालेल्या एक दिवशी लाक्षणिक उपोषण गाव बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गांधी चौक येथे बोलत होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच चंद्रकांत कांबळे होते.
इचलकरंजी सुळकुड पाणी योजना रद्द करावी यासाठी दत्तवाड सह घोसरवाड ,टाकळीवाडी ,नवे दानवाड ,जुने दानवाड, येथील सर्व व्यवहार बंद करून कडकडीत बंद पाळण्यात आला याबरोबरच या पाच गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी दत्तवाड येथील गांधी चौक येथे एक दिवशी लाक्षणिक उपोषण केले.
माजी आमदार उल्हास पाटील , भवानीसिंग घोरपडे, सुशांत पाटील, बाबासो पाटील, कर्नाटक बोरगाव येथील अण्णासो हावले , धनराज घाटगे, बबनराव चौगुले, बाळासाहेब पाटील अमोल शिवई ,मनोज कडोले, सागर कोडेकर , आंदोलन अंकुश चे धनाजी चुडमुंगे दिपाली परीट, मिनाज जमादार, बाबासो वनकोरे, सी डी पाटील , नितीन बागे,यांनी मनोगते व्यक्त केली.
*दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी दूधगंगा कृती समितीला पाठिंबा दिला असून ते बाहेरगावी असल्याने कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत मात्र त्यांनी तसा निरोप यावेळी दिला आहे*
यावेळी धनराज घाटगे, सागर कोडेकर, अमोल शिवई, मनोज कोडोले, बाळासो पाटील, विनायक आवळे, इंद्रजित पाटील, विजय आरेकर, अरूण मुदांना, क्रंतिकुमार पाटील, दतत्रय गायकवाड ,धनपाल जुगळे, राजगोंडा पाटील, अकबर काले साहेबराव साबळे, नंदकुमार नाईक, धन्यकुमार सिदनाळे , वैशाली पाटील ,उदय पाटील, महेंद्र बागे, भरत पाटील ,नूर काले,सुकुमार सिदनाळे, प्रकाश चौगुले, सुरेश पाटील, राजू पाटील, उपसरपंच मनीषा चौगुले , विवेक चौगुले भैय्या चौगुले, रफिक मुल्ला, खुशाल कांबळे, यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केले तर आभार ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील यांनी मानले.
नायब तहसीलदार योगेश जामदाडे, मंडल अधिकारी एस बी खोत तलाठी जमादार ग्राम विकास अधिकारी संतोष चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांचा मार्गदर्शना खाली बीट अंमलदार सानप यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.