Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

शिरोळ शहरात १०० कोटीची विकास कामे पूर्ण: अमरसिंह पाटील प्रभाग क्रमांक १ मधील विकास कामांचा शुभारंभ

शिरोळ / प्रतिनिधी :


 शिरोळ नगर परिषदेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात शासनाच्या विविध योजनेतून कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून सुमारे १०० कोटी रुपयाची विकास कामे पूर्ण केली आहेत यामुळे शहराचा चेहरा मोहरा बदलला असून सर्व विकासकामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण झाली आहेत असे प्रतिपादन प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी केले

     येथील प्रभाग क्रमांक १  मधील नंदीवाले वसाहत येथील माळी वस्ती रस्ता मुरमीकरण खडीकरण या विकास कामांचा शुभारंभ नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते व माजी सरपंच अर्जुन काळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला याप्रसंगी नगराध्यक्ष पाटील हे बोलत होते ते पुढे म्हणाले की शहरात साडे सत्तावीस कोटी रुपयाची नळ पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर यामुळे जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणी लवकरच मिळणार आहे तसेच शहरातील उपनगरात व नागरी वस्तीवर स्ट्रीट लाईटची सोय करण्याकरिता जवळपास१५०० विद्युत खाब उभारून त्याच्यावर बल्ब लावण्यात आले असून रात्रीच्या वेळी नागरिकांची सोय करण्यात आली आहे कल्लेश्वर तलाव सुशोभीकरण सांस्कृतिक सभागृह रस्ते गटारी हे विकास कामे पूर्ण करण्याकरिता सातत्याने शासनाकडून विविध योजनेतून निधी उपलब्ध केला यामुळे १०० कोटीची विकास कामे पूर्ण झाली आहेत

दरम्यान स्थानिक नागरिकांनी प्रभागातील विकासकामे पूर्ण करण्यात येत असल्याबद्दल नगराध्यक्ष अमरसिंह पाटील उपनगराध्यक्षा सौ करुणा कांबळे यांच्यासह नगरसेवकांचा सत्कार केला यावेळी नगरसेवक पै प्रकाश गावडे राजेंद्र माने योगेश पुजारी तातोबा पाटील प्रा अण्णासाहेब माने गावडे  नगरसेविका सौ कमलाबाई शिंदे सुरेखा पुजारी कुमुदिनी कांबळे श्रीमती जयश्री धर्माधिकारी सामाजिक कार्यकर्ते जनार्दन कांबळे अमरसिंह शिंदे अण्णासो पुजारी सुरज कांबळे कॉन्ट्रॅक्टर लक्ष्मण भोसले दीपक शिंदे अबिद गवंडी गणेश चुडमुंगे हरीश माने स्वप्निल ढेरे सुमित देसाई रवींद्र महात्मे अजय सावंत दत्तात्रय सावंत दिपक माळी संजय माळी बजरंग माळी प्रमोद पाटील बापू माळी विजय माळी गजानन माळी यशोदिप बेंदरे सुरज माळी यांच्यासह  प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .