Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

मौजे आगरच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात जागतिक छायाचित्र दिन साजरा.

शिरोळ : प्रतिनिधी : 


विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे अगर विद्यालयात जागतिक छायाचित्र दिन व संस्थेचे संचालक कै. बाबासाहेब पाटील स्मृतिदिन या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते 

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कै. बाबासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागतपर प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक खंडेराव जगदाळे यांनी केले. फोटोग्राफर हे समाजाचे प्रतिबिंब आहेत, समाजात त्यांना आदराचे स्थान मिळायला हवे ही भावना त्यांनी व्यक्त केली.

 संस्थेचे संचालक अमोल चव्हाण यांना आदर्श सरपंच समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे खजिनदार कृष्णात पाटील यांनी सदर कार्यक्रमात विद्यालयास समई प्रदान केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी सरपंच बजरंग सुतार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.  छायाचित्र दिनाचे औचित्य साधून शिरोळ व आगर परिसरातील फोटोग्राफर यांचा विद्यालयामार्फत सन्मानपत्र शाल ,टोपी ,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यामध्ये सुनील पोळ, सुधीर सुतार, अभिजीत गुरव, शितल कुंभार, योगेश खाडे, विनायक चुडमुंगे, दिपक थोरात, शुभम बावचे, अझर अत्तार, संतोष काळे, अक्षय चौगुले, गुरुदत्त माने गावडे, सुयोग मोहिते,  मनोज जाधव, इत्यादींना सन्मानित करण्यात आले. 

शिक्षक मनोगत सौ जयश्री पाटील यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या विद्यार्थ्यांच्या व समाजात फोटोग्राफरांच्या कार्याची जनजागृती व्हावी, त्यांची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःमधील सुप्त गुणांना वाव द्यावा, हा उदात्त ठेवून संस्थेचे सचिव मेजर के.एम. भोसले यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. फोटोग्राफरांच्या दुर्मिळ फोटोंच्या प्रदर्शनातून विद्यार्थ्यात या कलेविषयी जाणीव जागृती खर्‍या अर्थाने निर्माण झाली. संतोष काळे यांनी आपल्या मनोगतात स्वतः कोणताही एक छंद जोपासून त्यातून स्वतःची ओळख निर्माण करा हा विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला. संस्थेचे सचिव मेजर के.एम. भोसले म्हणाले की वर्तमान, भूत, भविष्य, हा त्रिवेणी संगम कैद करणारे व्यक्तिरेखा म्हणजे छायाचित्रकार होत. भारतीय संस्कृतीचे जतन करणारे शिल्पकार होत. वर्तमान पत्राचा तिसरा डोळा बनून समाजाचे छायाचित्राच्या माध्यमातून प्रबोधन करतात. कार्यक्रमाचे आभार  शिक्षिका गिरिजा कांबळे यांनी मानले संस्थेचे अध्यक्ष जगदीश पाटील, उपाध्यक्ष शहाजीराव दाभाडे, खजिनदार कृष्णात पाटील, संचालक सुरेश पाटील,  अरुण पोटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तुकाराम पाटील,  कै. पाटील यांच्या पत्नी श्रीमती सुशीला पाटील, स्नुषा आशा पाटील व परिवार, पृथ्वीचंद माछरेकर, सुप्रिया दाभाडे, सर्जेराव पोवार, सिद्धार्थ कांबळे, विद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. छायाचित्र  प्रदर्शनास आगरमधील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला सूत्रसंचालन नितीन बागुल यांनी केले.