लोकप्रतिनिधी व नगरसेवकांची साथ आणि जनतेच्या विश्वासामुळे कामाची वचनपूर्ती अमरसिंह पाटील प्रभाग क्रमांक ५ मधील २४ लाख ९९ हजार रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ
शिरोळ : प्रतिनिधी :
शिरोळ शहरात कोट्यावधी रुपयांची विकास कामे झाली आहेत . काही दिवसातच गावच्या नळ पाणीपुरवठा कामाबरोबरच अन्य नियोजित कामे पूर्ण होत आहे . जनतेचा विश्वास , नगरसेवकांची साथ आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे निवडणुकीत दिलेल्या कामांची वचनपूर्ती पूर्णत्वास येत आहेत. गुणवत्तापूर्ण व पारदर्शक कोटयावधी रुपयांची विकास कामे करताना सर्वांचे चांगले सहकार्य मिळाले असून लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून मला पाच वर्ष जनसेवा करण्याची संधी मिळाल्याचा आनंद वाटतो , असे प्रतिपादन प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी केले .
येथील प्रभाग क्रमांक ५ मधील समता नगर येथील विटेकरी घर ते नुरुद्दिन मोमिन घर रस्ता खडीकरण / डांबरीकरण करणे व दिपक गावडे प्लॉट ते दिपक माने घर रस्ता कॉक्रिटीकरण करणे या विकास कामांचा शुभारंभ नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते व माजी सरपंच अर्जुन काळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला याप्रसंगी नगराध्यक्ष पाटील हे बोलत होते .
दरम्यान स्थानिक नागरिकांनी प्रभागातील विकासकामे पूर्ण करण्यात येत असल्याबद्दल नगराध्यक्ष अमरसिंह पाटील उपनगराध्यक्षा सौ करुणा कांबळे यांच्यासह नगरसेवकांचा सत्कार केला नगरसेवक पै प्रकाश गावडे राजेंद्र माने योगेश पुजारी तातोबा पाटील प्रा अण्णासाहेब माने गावडे नगरसेविका सौ कमलाबाई शिंदे सुरेखा पुजारी कुमुदिनी कांबळे श्रीमती जयश्री धर्माधिकारी सामाजिक कार्यकर्ते जनार्दन कांबळे अमरसिंह शिंदे अण्णासो पुजारी माणिक विटेकरी दिगंबर सकट विजय कांबळे गोपिचंद विटेकरी नुरुद्दिन मोमीन भाऊसाहेब कदम गफार बैरागदार नदाफ गादिवाले नियाज टेलर सहदेव कांबळे शमशुद्दिन मुजावर महेंद्र कांबळे कटकोळे सर अझर मोमीन सुरज कांबळे कॉन्ट्रॅक्टर विनीत माने लक्ष्मण भोसले दीपक शिंदे अबिद गवंडी गणेश चुडमुंगे हरीश माने स्वप्निल ढेरे सुमित देसाई रवींद्र महात्मे यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .