श्री कल्लेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ
शिरोळ : प्रतिनिधी :
श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि नागपंचमीच्या निमित्ताने दर्शनासाठी पहाटेपासूनच येथील श्री कल्लेश्वर मंदिरात भाविकांची रीघ लागली होती अभिषेक महापूजा आरती यासह विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले
येथील कल्लेश्वर तलावानजीक असणाऱ्या श्री कल्लेश्वर मंदिरात सोमवारी पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रम सुरू होते मंदिराचे पुजारी अशोक गुरव अभिजीत गुरव शक्तीजीत गुरव यांच्यासह गुरव परिवारातील सदस्यांनी पहाटे श्री महादेवाच्या पिंडीस अभिषेक अर्पण करून महापूजा आरती केली यावेळी अनेक भक्तांनी या धार्मिक सोहळ्याचा आनंद घेतला तसेच अनेक भाविकांनी या निमित्ताने अभिषेक अर्पण करून प्रार्थना केली तसेच श्री महादेवाच्या पिंडीचे व मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची रीघ लागली होती आज सर्व भाविकांनी मनोभावे श्री शिवशंकराची आराधना केली या निमित्ताने दिवसभर मंदिर परिसर गजबजून गेला होता