माझी माती माझा देश अभियान अंतर्गत शिरटी येथे विविध उपक्रम
शिरोळ --
: प्रतिनिधी : शिरटी( ता शिरोळ) येथे माझी माती माझा देश या अभियान अंतर्गत गुरुवारपासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत सरपंच हसीना मुल्लाणी यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले
माझी माती माझा देश या अभियानाची शिरटी येथे गुरुवारी सकाळी सरपंच हसीना मुलानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली तसेच येथील स्वातंत्र्य सैनिकांच्या शीलाफलकाचे अनावरण माजी सैनिक मेजर कुमार कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर उपस्थितांनी पंचप्रण शपथ घेतली.
यानंतर स्वातंत्र्य सैनिकांना व वीरांना मानवंदना देण्यात आली या ठिकाणी शहीद स्वातंत्र्य सैनिकांची वीर पत्नी शांताबाई शिवाजी रोडे माझी सैनिक मेजर कुमार कांबळे मोहन कांबळे यांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका शांताबाई हावले आणि नव्याने मदतनीस म्हणून सेवेत रुजू झालेल्या फरीदा रांगोळे यांचा सत्कार करण्यात आला
येथील मराठी शाळेत व सार्वजनिक स्मशानभूमीत वसुधा वंदन या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले तसेच दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत सर्व ग्रामस्थांनी हर घर तिरंगा या उपक्रमात सहभाग घेऊन आपल्या घरी तिरंगा ध्वज फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
यावेळी उपसरपंच प्रकाश माळी माजी सरपंच राहुल सूर्यवंशी ग्रामपंचायत सदस्य सागर पवार अनिता चौगुले शुभांगी शिरगावे सुनीता माळी पोलीस पाटील मोहन बन्ने ग्राम विकास अधिकारी ए आर कुंभार आलम मुल्लाणी सतीश चौगुले राजकुमार शिरगावे सुनील माळी यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस आरोग्य विभाग व शासकीय कर्मचारी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते