दोन्ही शिवाजीरावांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा: दरगु गावडे गुरुदत्तचे संचालक शिवाजीराव माने- देशमुख शिवाजीराव जाधव -सागले यांचा सत्कार
शिरोळ : प्रतिनिधी :
शिरोळच्या विकासात आपले योगदान देणारे माजी सरपंच शिवाजीराव माने- देशमुख व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव जाधव- सागले यांची गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडी या साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड झाली याचा शिरोळकरांना अभिमान असून आपल्या संचालक पदाच्या माध्यमातून दोन्ही शिवाजीरावांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक व माजी सरपंच दरगू गावडे यांनी केले
दत्तचे संचालक दरगू गावडे व मित्र परिवाराच्या वतीने श्री दरगोबा ट्रान्सपोर्ट या कार्यालयात गुरुदत्त शुगर्सचे नूतन संचालक शिवाजीराव माने- देशमुख व शिवाजीराव जाधव- सागले यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी दरगू गावडे हे बोलत होते दोन्ही संचालकांचा फेटा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
सत्काराला उत्तर देताना संचालक शिवाजीराव माने- देशमुख म्हणाले की श्री दत्त नागरी पतसंस्थेचा चेअरमन म्हणून सन २०१८ पासून काम करण्याची संधी मिळाली यावेळी ठेवीदार सभासद कर्जदार आणि कर्मचारी यांचे हित जोपासण्याचे काम केले गुरुदत्त शुगर्सच्या संचालक पदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले
माजी सरपंच गजानन संकपाळ यांनी स्वागत केले दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील-नरदेकर यांनी आभार मानले नगरसेवक पै प्रकाश गावडे दरगोबा सहकारी दूध संस्थेचे चेअरमन आप्पासाहेब गावडे वाल्मिकी चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक बाळासाहेब कोळी देवाप्पा पुजारी इंजिनियर नितीन शेट्टी सामाजिक कार्यकर्ते रसूल मोमीन गजानन कोळी कृष्णा शिंदे बाबासो पुंदे दिनकर पाटील गणेश बावडेकर किरण कांबळे जीवन आवळे यांच्यासह मान्यवर व नागरिक उपस्थित होते