मेरी माटी मेरा देश या उपक्रमामुळेच राष्ट्राभिमान जागृत: अमरसिंह पाटील शिरोळात स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय व माजी सैनिकांचा सन्मान
मेरी माटी मेरा देश या उपक्रमामुळेच राष्ट्राभिमान जागृत: अमरसिंह पाटील
शिरोळात स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय व माजी सैनिकांचा सन्मान
शिरोळ : प्रतिनिधी :
प्रत्येकाच्या मनात आपल्या माती विषयी जनजागृती प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटणारे आणि त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान व्हावा यासाठी मेरी माटी मेरा देश तथा मिट्टी को नमन वीरों का वंदन उपक्रमाचे आयोजन करून राष्ट्राभिमान जागृत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रतिपादन शिरोळचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी केले
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मेरी माटी मेरा देश हा उपक्रम शिरोळ नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात आला या उपक्रमानिमित्ताने शनिवारी विविध कार्यक्रम संपन्न झाले यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील बोलत होते
शनिवारी सकाळी नगरपरिषदेच्या कार्यालयात नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले येथील कल्लेश्वर तलाव परिसरात स्वातंत्र सैनिकांच्या नावाच्या शिलाफलकाचे अनावरण स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय माजी सैनिक आणि नगरपालिकेचे पदाधिकारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले वीर पत्नी श्रीमती सुमन प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीत व झेंडा गीत गाऊन ध्वजवंदना देण्यात आली
या समारंभात हातात पेटती पणती घेऊन सामुदायिक पंचप्रण शपथ घेण्यात आली यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी लढा देणारे शिरोळमधील स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा व स्वातंत्र्यानंतर आपल्या जीवाची पर्वा न करता देशाचे रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांचा वीर पत्नी वीर माता यांचा यथोचित गौरव करण्यात आला
पद्माराजे विद्यालयाच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी ध्वजारोहण समारंभात मानवंदना दिली
या समारंभानंतर वसुधा वंदन या उपक्रमांतर्गत ७५ देशी वृक्षाची लागवड करण्यात आली
या संयुक्त समारंभात शिरोळ शहर सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष संजय इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले पालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव यांनी स्वागत केले पालिकेचे प्रशासन अधिकारी लक्ष्मण लोंढे यांनी आभार मानले कार्यालयीन निरीक्षक संदीप चुडमुंगे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपनगराध्यक्षा सौ कुमुदिनी कांबळे नगरसेविका सौ कमलाबाई शिंदे अनिता संकपाळ सुनिता आरगे विदुला यादव करुणा कांबळे जयश्री धर्माधिकारी नगरसेवक राजेंद्र माने योगेश पुजारी राजाराम कोळी तातोबा पाटील प्रा अण्णासाहेब माने गावडे एन वाय जाधव प्रदीप चव्हाण सामाजिक कार्यकर्ते जनार्दन कांबळे अमरसिंह शिंदे माजी सैनिक शंकर मेथे, सुधाकर आरदाळे, मोहन कोगे, दगडू कांबळे ,पोपट कांबळे, बबन गावडे, खंडेराव बारवाडकर, बापू मुल्ला, विजय पवार, हणमंत काळे, रामदास गावडे, दत्तात्रय गावडे ,कुमार ढाले ,संभाजी गावडे, विश्वास पाटील, अरविंद माळगे, शिवाजी कांबळे, सर्जेराव पाटील ,शिवाजी काळे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय माजी सैनिकांच्या नातेवाईक तसेच पद्माराजे विद्यालयाचे प्राचार्य सी एस पाटील उपप्राचार्य तुकाराम गंगधर अविनाश माने आनंद पुजारी सुभाष माळी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते