टाकळीवाडी येथे प्रथमच अश्व रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
टाकळीवाडी येथे प्रथमच अश्व रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
टाकळीवाडी ता.शिरोळ येथे पुरुषोत्तम अधिक मास समाप्ती निमित्त किर्तन दिंडी व अश्वरिंगण सोहळा श्री विठ्ठल रुक्मिणी व हनुमान मंदिर, श्री सांप्रदायिक भजनी मंडळ, सर्व युवक मंडळ, ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने इतिहासात प्रथमच अश्वरिंगण सोहळा ठेवण्यात आलेला होता.
ध्वजारोहण व विणापूजन ह.भ.प. गुरु श्री देवव्रत राणू मालक वासकर महाराज पंढरपूर यांच्या हस्ते संपन्न झाला.
दि.15/08/2023 रोजी प्रवचन कीर्तन व रात्री हरीजागर हा कार्यक्रम संपन्न झाला.
दि.16/08/2023 रोजी काला कीर्तन व माऊलींच्या अश्वासह सुवासिनी कळस पालखी सोहळा,नगर प्रदक्षिणा व अश्व रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे श्री गुरुदत्त शुगर्स चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे व भवानीसिंह घोरपडे सरकार यांचा सत्कार करण्यात आला.
श्रीमंत सरदार वर्जितसिंहराजे शितोळे सरकार अंकलीकर यांचे अश्व रिंगण सोहळ्यासाठी उपस्थितीत होते.
शिरोळ तालुक्यात प्रथमच हा रिंगण सोहळा आयोजित करण्यात आले होता.सर्वत्र टाकळीवाडी गावचे कौतुक होत आहे. महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. विठ्ठल गजरात गाव दुमदुमून गेले.
या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सरपंच सर्व सदस्य,तरुण मंडळे,सर्व आजी-माजी सैनिक,सांप्रदायिक भजनी मंडळ,समस्त नागरिक, सरस्वती हायस्कूल,विद्या मंदिर टाकळीवाडी या सर्वांचे सहकार्य लाभले.