Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर, विद्यालयात 'मेरी माटी मेरा देश' अभियान विविध उपक्रमांनी साजरा

 न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर, विद्यालयात 'मेरी माटी मेरा देश' अभियान विविध उपक्रमांनी साजरा

शिरोळ : प्रतिनिधी :


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता दिनांक ३० ऑगस्ट २०२३ रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 'मेरी माटी मेरा देश' अभियान राबविले. या अभियाना अंतर्गत विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मौजे अगर येथील न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयातील विद्यार्थ्यांना आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम निर्माण व्हावे, वीर योद्धांच्या समर्पणाचे स्मरण व्हावे यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत विद्यालयाच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी पंचप्रण शपथ घेतली. पंचप्राण शपथ वाचन सौ जयश्री पाटील यांनी केले. सोमवारी माजी सैनिक जनार्दन कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी केलेल्या देश सेवेबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.  मुंबई मंत्रालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेला माजी विद्यार्थी प्रवीण डुबल यांचाही सपत्नीक सत्कार करण्यात आला. 'वीरों को नमन' या उपक्रमांतर्गत अनभिज्ञ असलेल्या क्रांतिवीरांच्या माहितीचे पोस्टर व ग्रंथ प्रदर्शन विद्यालयात आयोजित करण्यात आले होते या उपक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव मेजर के एम भोसले  व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते  खंडेराव हेरवाडे यांनी क्रांतिवीरांच्या कार्याची माहिती  विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यालयाचे मुख्याध्यापक खंडेराव जगदाळे यांनी 'मेरी माटी मेरा देश' अभियानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना विशद केले. माजी सैनिक जनार्दन कांबळे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी मातृभूमीबद्दल आदर बाळगावा ही भावना व्यक्त केली. प्रवीण डुबल यांनी विद्यार्थ्यांना स्वतःला सक्षम बनवण्यासाठी वाचनाचे महत्त्व सांगितले. 

संस्थेचे सचिव मेजर के.एम. भोसले यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात शिस्तप्रिय राहावे, तसेच समाजातील प्रत्येक व्यक्तीप्रती आदर बाळगावा, विद्यार्थ्यांनी आदर्श नागरिक बनावे ही सदिच्छा व्यक्त केली.

सदर उपक्रम पार पाडण्यासाठी नीता कांबळे, पृथ्वीचंद माछरेकर, सर्जेराव पवार, सिद्धार्थ कांबळे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार सौ सुप्रिया दाभाडे यांनी मानले. सूत्रसंचालन नितीन बागुल यांनी केले. यिन अध्यक्ष, के आय टी विधानसभा माजी मुख्यमंत्री कनवाडचे सुपुत्र अमन पटेल, तसेच मौजे आगर मधील भारतीय सैन्य दलात नियुक्त असलेले सुपुत्र सत्यम कोळी यांनी सदर प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांना देशभक्तीसाठी प्रेरित केले. ग्रंथ प्रदर्शन व क्रांतीवीरांचे पोस्टर प्रदर्शनास मौजे आगर मधील नागरिकांनी पालकांनी भेट देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.