काँग्रेस ओबीसी तालुका अध्यक्षपदी नवे दानवाड चे माजी सरपंच संजय धनगर यांची निवड.
*काँग्रेस ओबीसी तालुका अध्यक्षपदी मा.सरपंच संजय धनगर यांची निवड.
नवे दानवाड (प्रतिनिधी) :-
*काँग्रेस पक्ष ओबीसी शिरोळ तालुका अध्यक्षपदी* नवे दानवाड गावाचे माजी सरपंच *श्री. संजय आप्पासो धनगर* यांची... *महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी अध्यक्ष मा.भानुदास माळी* यांच्या *शुभहस्ते पत्र देऊन निवड करण्यात आले.*
मा.सरपंच संजय धनगर हे नवे दानवाड गावाचे सरपंच म्हणून 2006-2010 या कालावधीत काम पाहिले असून, त्यांच्या काळात.... त्यांनी *गावाचा महत्वाचा दूधगंगा पाणी उपसा प्रश्न मार्गी लावला होता* ,तसेच *तंटामुक्त अध्यक्ष म्हणून ही त्यांनी काम पाहिले असून अनेक न्यायनिवाडे करून त्यांनी गावाचे अनेक गंभीर प्रश्न मार्गी काढले आहेत.*
संजय धनगर हे सध्या बाळासाहेब ग्रामीण पतसंस्थेचे मार्गदर्शक असून त्यांनी या पतसंस्थेचे स्थापणेमध्ये महत्वाची भूमिका असून या पतसंस्थेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेस मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत संजय धनगर हे करत असतात.
तसेच... *कै. रामगोंडा पाटील विकास सोसायटीचे संचालकपदी* ही ते काम पाहत असून *या सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी साठीही त्यांचा काम गावात उल्लेखनीय आहे.*
2019-2021 च्या महापुरमध्ये कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी गावच्या जनतेचे सेवा आस्मितेने केलेले आहे.
*संजय धनगर हे सतेज उर्फ बंटी पाटील* व *उद्यानपंडित गणपतदादा पाटील* यांच्या विचाराचे कार्यकर्ते असून *काँग्रेस पक्षाचे ते तालुक्यात प्रामुख्याने काम करत असतात.*
त्यांना *तालुका ओबीसी अध्यक्ष पद मिळण्यासाठी सर्जेराव शिंदे,शेखर पाटील,महेंद्र बागे,अशोक कोळेकर,योगेश पुजारी यांचा सहकार्य लाभले.*
नवे दानवाड येथील *बिरदेव मंदिर* येथे त्यांचा सत्कार* करण्यात आला. यावेळी, *सज्जनसिंग रजपूत, रामा बेरड, अॅड. राहूलराज कांबळे, माजी सरपंच बशीर गवंडी, पिंटू माळी, शिवाजी सांळुखे, भगतसिंग शिलेदार, शहाणूर गवंडी, पांडुरंग धनगर, कपील पाटील, प्रल्हाद सांळुखे, खुतूबुद्दीन सय्यद, सिद्राम कांबळे, रोहन रजपूत, संजय कांबळे, कुलदीप रजपूत, रावसो धनगर, पिंटू देसाई, वैभव धनगर इ. उपस्थित होते.*
संजय धनगर यांच्या निवडीनंतर त्यांच्या कार्यकर्ते कडून *मोठ्या प्रमाणात जल्लोष व आतीशबाजी करण्यात आली.*