शासनाच्या विविध योजनेतून शिरोळचा सर्वांगीण विकास: अमरसिंह पाटील प्रभाग क्रमांक ४ व ५ मधील विविध विकास कामांचा शुभारंभ
शिरोळ : प्रतिनिधी :
शिरोळ नगर परिषदेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात शासनाच्या विविध योजनेतून कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून शिरोळ शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केले असल्याचे प्रतिपादन प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी केले
येथील प्रभाग क्रमांक ४ व ५ मधील ३७ लाख ५२ हजार रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते व माजी सरपंच अर्जुन काळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला याप्रसंगी नगराध्यक्ष पाटील हे बोलत होते
प्रभाग क्रमांक ४ मधील सुमन पाटील घर ते चुडमुंगे घर व हेमा जाधव घर ते डॉ . रवि फल्ले घरापर्यंत आर सी . सी . गटर्स करणे मंजूर रक्कम १५ लाख ९० हजार, रुपये तसेच संतोष पाटील घर ते राजेश पाटील घर रस्ता क्रॉक्रिटीकरण करणे मंजूर रक्कम १० लाख ८१ हजार रुपये त्याचबरोबर प्रभाग क्रमांक ५ मधील पंकज माने घर ते कुमार रणदिवे घर रस्ता डांबरीकरण करणे मंजूर रक्कम ५ लाख १५ हजार रुपये व अशोक माने घर ते केंगारे घर रस्ता डांबरीकरण करणे मंजूर रक्कम ६ लाख ६६ हजार रुपये अशा एकुण ३७ लाख ५२ हजार रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारभ करण्यात आला
स्थानिक नागरिकांनी प्रभागातील विकासकामे पूर्ण करण्यात येत असल्याबद्दल नगराध्यक्ष अमरसिंह पाटील उपनगराध्यक्ष सौ करुणा कांबळे यांच्यासह नगरसेवकांचा सत्कार केला यावेळी नगरसेवक पै प्रकाश गावडे राजेंद्र माने योगेश पुजारी तातोबा पाटील प्रा अण्णासाहेब माने गावडे इम्रान अत्तार नगरसेविका सौ कमलाबाई शिंदे सुनिता आरगे सुरेखा पुजारी कुमुदिनी कांबळे श्रीमती जयश्री धर्माधिकारी सामाजिक कार्यकर्ते जनार्दन कांबळे अमरसिंह शिंदे अण्णासो पुजारी सुरज कांबळे कॉन्ट्रॅक्टर दीपक शिंदे अबिद गवंडी गणेश चुडमुंगे हरीश माने स्वप्निल ढेरे सुमित देसाई लक्ष्मण भोसले रवींद्र महात्मे यांच्यासह दोन्ही प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते