अकिवाट येथील महादेव मंदिर परिसरात वावरत असलेले मगर पकडणेस रेस्क्यु फोर्स ला यश
अकिवाट वार्ता*
अकिवाट येथील महादेव मंदिर परिसरामध्ये पडीक विहीर आहे.यामध्ये साधारण अडीच ते तीन फुट मगर आढळून येत होती.सदरचा परिसर हा नागरी वस्ती तसेच शाळा-हायस्कूल कडे जाण्याचा मुख्य मार्ग आहे. मगर विहिरच्या काठावर वारंवार दिसत असल्याने भितीचे वातावरण होते.शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मगर विहीरी बाहेर आली असता.स्थानिक युवकांच्या निदर्शनास आल्यानंतर हेल्पिंग हँन्ड रेस्क्यू फोर्सशी संपर्क साधला.तेथे प्राणी मित्र अमर पाटील,निलेश तवंदकर,श्रेयश धुमाळे,विश्वनाथ रजपूत हे ताबोडतोब जाऊन मगरीस सुरक्षितपणे धरुन वनरक्षक अरुण खामकर यांच्याशी संपर्क साधून मगरीस नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुहास पाटील,तंटामुक्त अध्यक्ष श्रेणिक चौगुले व रेस्क्यू फोर्स चे सदस्य,स्थानिक नागरिकांचे सहकार्य लाभले.अजून साधारण एक-दोन मगर विहीरीत असतील असा अंदाज नागरिक सांगत आहेत.