सीमा भागासह दूधगंगा काठच्या शिरोळ तालुक्यातील 11 गावांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा
दत्तवाड -
इचलकरंजी शहरासाठी मंजूर असलेली सुळकुड अमृत दोन पाणी योजना रद्द करावी यासाठी सीमा भागासह शिरोळ तालुक्यातील दूधगंगा काठावरील शेतकरी एकवटला असून सोमवार दिनांक २८ रोजी गावे बंद ठेवून शिरोळ तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून योजना रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
इचरकंजी शहरासाठी मंजूर झालेली अमृत दोन योजनेमुळे शिरोळ तालुक्यातील घोसरवाड दत्तवाड नवे दानवाड,जुने दानवाड , येथील टाकळीवाडी येथील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा तर हेरवाड, अब्दुललाट , शिरदवाड, शिवनाकवाडी ,सैनिक टाकळी येथील पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे याबरोबरच सीमा भागातील बोरगाव ,सदलगा ,मलिकवाड ,वडगोल, एकसंबा, कल्लोळ या गावांना देखील पाणी प्रश्न निर्माण होणार आहे. २८ तारखेच्या मोर्चासाठी या सर्व गावातून शेतकरी एकत्र येत असून यांची दररोज गावागावात बैठक होत आहे.
यासंबंधीचे निवेदन तहसीलदार शिरोळ, कुरुंदवाड पोलीस स्टेशनला दूधगंगा बचाव कृती समितीने दिले आहे
दत्तवाड येथील दूधगंगा कृती समितीचे बबनराव चौगुले, धन्यकुमार सिदनाळे,सरपंच चंद्रकांत कांबळे, ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील ,सूर्यकांत चौगुले, विवेक चौगुले सुरेश पाटील राजू पाटील बाबुराव पवार युवराज घोरपडे हे प्रत्येक गावात जाऊन नियोजन करत असून २८ ला शिरोळ तहसीलदार कार्यालय मोर्चा मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आव्हान दूधगंगा कृती समितीमार्फत करण्यात आले आहे.