राजश्री शाहू वाचनालयास सर्वतोपरी सहकार्य : रणजीत कदम उल्हास पाटील यांच्याकडून वाचनालयास ग्रंथ कपाट भेट
शिरोळ : प्रतिनिधी :
येथील राजर्षी शाहू नगर वाचनालयास श्री दत्त शेतकरी सहकारी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार स्व. दत्ताजीराव कदम (आण्णा) यांचे स्मरणार्थ युवा सामाजिक कार्यकर्ते उल्हास उत्तमराव पाटील यांनी ग्रंथ कपाट भेट दिली. तसेच वाचनालयाच्या अभ्यासिकेची विद्यार्थी गायञी अरुण माने हिची केंद्रीय पोलीस दलात निवड झालेबद्दल दत्त साखर कारखान्याचे संचालक रणजीत कदम यांच्या हस्ते करण्यात आला.अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील हे होते.
स्वागत वाचनालयाचे संचालक एम् एस् माने यांनी केले. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक रणजीत कदम बोलताना म्हणाले की स्व. दत्ताजीराव कदमआण्णानी शिरोळच्या माळावर दत्त साखर कारखाना उभारून शिरोळवर असणारे प्रेम दाखवुन दिले.भविष्यात वाचनालयाच्या वाटचालीस लागणारी मदत देण्यास मी वचनबध्द आहे. आमचे स्नेही उत्तमराव पाटील समाज सेवेचा छंद असल्यामुळे कदमआण्णाच्या बरोबर राहण्याचे पसंत केले.उत्तमरावाचे आणि आमच्या कुटुंबियांचा संबंध अत्यंत जिव्हाळ्याचा आहे.
जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष बजरंग काळे यांनी स्व. कदमआण्णांच्या सहवासात राहण्याचा योग माझ्या जीवनात शेवटच्या वेळी आला. आण्णांचा आणखीन वेळ शिरोळ नगरीला आणखी लाभला असता तर शिरोळचा कायापालट झाला असता पण हे आपले दुर्दैव आहे.
या कार्यक्रमास उपनगराध्यक्षा सौ करुणा कांबळे नगरसेवक डॉ अरविंद माने रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष संजय तुकाराम शिंदे सचिव तुकाराम पाटील ट्रेझर संजय रामचंद्र शिंदे सदस्य उल्हास पाटील डॉ अतुल पाटील प्रा काशिनाथ भोसले महेश माने भरत गावडे राहुल माने चंद्रकांत भाट सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव पाटील शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई सामाजिक कार्यकर्ते प्रकाश माळी प्रल्हाद पाटील मौजे आगरचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील माजी सरपंच अर्जुन काळे ह भ प एकनाथ पाटील अरुण माने दिनकर पाटील वाचनालयाचे कार्यवाह धनाजीराव जाधव संचालक आप्पासो पुजारी अशोक गंगधर चंद्रकांत माने गावडे नानासाहेब जाधव पंडित काळे रामचंद्र पाटील ग्रंथपाल संभाजी चव्हाण सहाय्यक ग्रंथपाल सौ रुपाली कुंभार लिपिक बाबुराव मोरे शिपाई विजय धनगर प्रदीप जगदाळे दिनकर पाटील यांच्यासह वाचक उपस्थित होते. वाचनालयाचे अध्यक्ष आण्णासो माने गावडे यांनी आभार मानले.