Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर कडून निधी...... श्री गुरुदत्त शुगर्स चे मोलाचे योगदान.



टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील सैनिक वेल्फेअर असोसिएशन टाकळीवाडी यांनी कारगिल विजय दिवस निमित्त वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम राबिवलेला होता .

त्यामध्ये गावातील सर्व ग्रामस्थ, हायस्कूल शाळेचे शिक्षक , विद्यार्थी, सर्व आजी माजी सैनिक, व परीवार यांनी खूप मोठे योगदान दिले आहे.

   वृक्षारोपण  कॉम्पिटिशनमध्ये संघटनेने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक ची पारितोषक 20000 /- रुपये सैनिक कल्याण सह अधिकारी श्री अशोक पवार साहेब यांच्या हस्ते संघटनेचे संस्थापक रमेश निर्मळे व अध्यक्ष दादा खोत यांनी स्वीकारले आहे. त्याबद्दल सर्वांना खूप खूप अभिनंदन, समीरा अरकाटे साहेब यांच्या संकल्पनेतून व सुरेश बदामे साहेब यांनी रोपे मिळवून देण्यासाठी मदत केली.

  तसेच श्री गुरुदत्त शुगर्स लि,यांचेकडून JCB ची मदत मिळाली.तसेच गावातील तंटा मुक्त अध्यक्ष केंदबा कांबळे, गोपाल निर्मळे, सुदर्शन शिरगुप्पे,महादेव बदामे ,नंदु कांबळे, विशेष म्हणजे लक्ष्मण निर्मळे यांचे 13 ऑपरेशन होऊन सुद्धा खूप चांगले योगदान दिले.

 सेवारत सैनिक सुट्टीवर असताना राहुल खानिकुडे व प्रवीण पाटील यांनी सुद्धा योगदान दिले. टेम्पो ड्रायव्हर कृष्णा बदामे, सर्व सैनिक परीवार मदतीने मराठी शाळा, हायस्कूल, स्मशान भूमी, व रोड वरती रोपे लावली.

 संघटनेच्या सर्व आजी माजी सैनिक व परीवार व सर्व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य या सर्वांचे कौतुक होत आहे.